Chennai Crime News: एक्स बॉयफ्रेंडचे बारिक तुकडे करून जमिनीत पुरलं...; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

या प्रकरणी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनेच त्याची हत्या केली असल्याचे समजले आहे.
Chennai Crime
Chennai CrimeSaam Tv
Published On

Girlfriend Killed Ex Boyfriend : तमिळणाडूमधून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. सदर तरुण मार्च महिन्यात हरवला असल्याची तक्रार करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत असून आता या प्रकरणी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनेच त्याची हत्या केली असल्याचे समजले आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चेन्नईच्या कोवलम परिसरात मृत व्यक्ती राहत होता. तसेच आरोपी महिल भाग्यलक्ष्मी एक वेश्या वैवसायिक असल्याचे समजले आहे. या महिलेने आपल्या मित्रांच्या मदतीने एक्स बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. पीडित तरुण जयंत हा चेन्नईच्या ऐअरलाईन्समध्ये काम करत होता.

Chennai Crime
Sasural Simar 2: 'ससुराल सिमरका 2'होणार बंद; गंभीर कारण उघडकीस

शरीराचे तुकडे करत जमिनीत गाडले.

भाग्यलक्ष्मीने जयंत तिला भेटण्यासाठी आल्यानंतर त्याला मारहाण करत त्याची हत्या केली. त्यानंतर तिने जयंतच्या शरीराचे तुकडे केले. हे सर्व तुकडे तिने नंतर आपल्या मित्रांच्या सहाय्याने जमिनीत पुरले. जयंत हा चेन्नईमध्ये आपल्या बहिनीच्या घरी राहत होता. २० मार्च रोजी भाऊ गायब असल्याची तक्रार त्याच्या बहिनीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

असा लावला आरोपी महिलेचा शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेचा परर्दाफाश करण्यासाठी पोसिलांनी जयंतचा मोबाईल फोन लोकेशन आणि कॉल डाटा तपासला. फोन तपासून त्यामध्ये जयंतचे भाग्यलक्ष्मीसोबत शेवटचे बोलणे झाल्याचे समजले. त्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Chennai Crime
Solar Fan Viral Video : बाबा जोमात नेटकरी कोमात! उन्हापासून बचावासाठी लढवली शक्कल; थेट डोक्यावर फिक्स केला पंखा

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर महिला वेश्या वैवसायिक असूनही जयंत तिच्यावर प्रेम करत होता. काही दिवसांपूर्वी या दोघांनी एका मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार टाकत लग्न केलं होतं. मात्र त्यांच हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. १८ मार्च रोजी भाग्यलक्ष्मी जयंतला भेटण्यासाठी बोलावते. त्यावेळी ती जयंतची हत्या करते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com