Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल 14 रुपयांनी स्वस्त होणार? आजचे नवीनतम दर तपासा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Published on

Petrol Diesel - गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्याचा परिणाम गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किमतींवरही दिसून आला. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत आज यूपी आणि हरियाणातील शहरांमध्ये उसळी दिसून येत आहे, तर बिहारमध्ये इंधनाच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल १७ पैशांनी महाग होऊन ९६.७६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १७ पैशांनी महाग होऊन ८९.९३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल 1 पैशांनी महाग होऊन ते 96.48 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 1 पैशांनी वाढून 89.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 29 पैशांनी महाग झाले असून, ते 97.18 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे, तर डिझेल 29 पैशांनी वाढून 90.05 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 14 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लिटर तर डिझेल 12 पैशांनी घसरून 94.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Petrol Diesel Prices
Ramdas Kadam : कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत आज घाबरले का? शिंदे गटातील नेत्याचा सवाल

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com