Omicron: परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम, प्रवाशांवर घातली बंधने

कोरोना विषाणूच्या नव्या रूपाने (Corona) जगभरात चांगलीच खळबळ उडाली
Omicron: परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम, प्रवाशांवर घातली बंधने
Omicron: परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम, प्रवाशांवर घातली बंधनेSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या नव्या रूपाने (Corona) जगभरात चांगलीच खळबळ उडाली आहे. काही दिवसाअगोदर अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या निर्बंधात शिथिलता दिली होती. यानंतर आता परत एकदा सर्व देशांनी प्रवास नियमांवर (International Travel) काही निर्बंध आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारत सरकारने देखील परदेशामधून येणाऱ्या प्रवाशांकरिता जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही सुधारणा केले आहेत. १ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नियमांमध्ये बदल करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

आता प्रवाशांना प्रवासाअगोदर एअर सुविधा पोर्टलवर कोविड-१९ आरटी- पीसीआर (RTPCR) चाचणीची निगेटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमधील बोत्सवाना येथे कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन समोर आल्यावर, भारत आपल्या प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करत आहे. ओमिक्रॉन स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंध शिथिल करण्याबाबत परत आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

रविवारी, सरकारने दिलेल्या माहितीनुसार की, १ डिसेंबरपासून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. याचबरोबर प्रवाशांना त्यांनी शेवटच्या १४ दिवसांत केलेल्या प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे. विशेष बाब म्हणजे, अलीकडे भारत सरकारने १५ डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. पण सरकारच्या या निर्णयाच्या एका दिवसानंतरच दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट समोर आला आहे.

Omicron: परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम, प्रवाशांवर घातली बंधने
आगार व्यवस्थापकास मारहाण; वाहक,चालकांवर गुन्हा दाखल

कोविड १९ च्या नवीन व्हेरिएंटची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, इस्रायल, हाँगकाँगमध्ये नवीन विषाणूची सर्वाधिक प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. यानंतर आता युनायटेड किंगडम मध्येही या विषाणूने शिरकाव केला आहे. याठिकाणी ओमिक्रॉनचे २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आली आहेत. भारताने या देशांना आधीच रेड लिस्टमध्ये टाकले आहे.

सध्या, भारताने दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल आणि यूके या देशांचा रेड लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या नवीन कोरोना विषाणू बाबत चेतावणी जारी करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट हा अन्य व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो, असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com