आगार व्यवस्थापकास मारहाण; वाहक,चालकांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद मध्ये मागील 22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
आगार व्यवस्थापकास मारहाण; वाहक,चालकांवर गुन्हा दाखल
आगार व्यवस्थापकास मारहाण; वाहक,चालकांवर गुन्हा दाखलकैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद मध्ये मागील 22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यात शनिवारी जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. उस्मानाबाद आगारातून काही बस सुरू करण्यात येत होते. दरम्यान बस सोडत असताना आगार व्यवस्थापकास मारहाण केल्याची घटना घडली होती.

हे देखील पहा-

याप्रकरणी दोन वाहक आणि एका चालकावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील स्थानकातील उस्मानाबाद- तुळजापूर बस सोडत होते. यावेळी बस वाहकाला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यामुळे आंदोलनासाठी बसलेल्या इतर वाहक आणि चालकाने पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आगार व्यवस्थापकास मारहाण; वाहक,चालकांवर गुन्हा दाखल
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ, प्रकरणात नवीन खुलासा

दरम्यान वाहक दत्ता माने, शंकर पडवळ आणि चालक गणेश मंडोळे यांनी तेथे आंदोलन करण्यासाठी हजर राहून पांडुरंग पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. तसेच पाटील यांचे कपडे देखील फाडण्यात आले व जिवे मारण्याची धमकी देऊन पाटील यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद पांडुरंग पाटील यांनी सरकारतर्फे आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com