Chandrayaan 3 News : चांद्रयान ३ साठी आज मोठा दिवस, लँडर आणि रोव्हर पुन्हा अॅक्टिव्ह होणार?

Chandrayaan 3 Reactive : लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होतील याची शक्यता खूपच कमी असल्याचंही त्यांनी म्हटलं.
Chandrayaan-3
Chandrayaan-3Saam Tv
Published On

Chandrayaan 3 News :

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून भारताचं कौतुक होत आहे. भारताचं विक्रम लँडर चंद्रावर पोहोचल्यानंतर चंद्राचे नवनवीन फोटो आणि त्याबद्दलची माहिती भारताला मिळत आहे.

ISRO(SAC)चे संचालक निलेश देसाई यांनी गुरुवारी (21 सप्टेंबर) वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळं काही जुळून आल्यास प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर अॅक्टिव्ह होतील, अशी आशा आहे. मात्र लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होतील याची शक्यता खूपच कमी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Chandrayaan-3
iPhone 15 Series Sale : आयफोनची क्रेझ! विमानानं आला, 17 तास रांगेत उभ राहून 1.60 लाखांचा फोन खरेदी केला

चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर लँडर आणि रोव्हरने तब्बल 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला. चंद्रावर 14 दिवस आणि 14 दिवस रात्र असल्याने लँडर आणि रोव्हर मागील दोन आठवड्यांपासून अंधारात होते. इस्रोने 2 आणि 4 सप्टेंबरला पूर्ण चार्जिंग करुन दोघांनाही स्लीप मोडमध्ये ठेवले होते. मात्र विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना मागील 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भयंकर थंडी आणि रेडिएशनमधून जावे लागले आहे.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना स्लीप मोडमध्ये ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे लँडर आणि रोव्हरमध्ये लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चंद्रावरील अतिथंड तापमानाचा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले नव्हते. ज्या ठिकाणी चांद्रयान-3 चे लँडिंग झालं आहे तिथे तापमान -200 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली जाते.

दरम्यान पृथ्वीच्या वेळेनुसार 20 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय सुरू झाला आहे. आज म्हणजे २२ सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हरचा स्लीप मोड ऑफ केला जाणार आहे.

सूर्याच्या प्रकाशाने रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल पुन्हा चार्ज होतील, अशी आशा आहे. सोलर पॅनेल यशस्वीरित्या पूर्ण चार्ज झाल्यास लँडर आणि रोव्हर पुन्हा अॅक्टिव्ह होतील. तसं झाल्यास चंद्रावरील आणखी रहस्य उलगडण्यासाठी इस्रोला आणखी १४ दिवस मिळू शकणार आहेत. इस्रोला हे शक्य झाल्यास असं भारतासाठी हे मोठं यश असेल.

Chandrayaan-3
Happy Life Tips: दु:खातही आनंदी राहाण्याची गुरुकिल्ली! या सोप्या टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com