iPhone 15 Series Sale : आयफोनची क्रेझ! विमानानं आला, 17 तास रांगेत उभ राहून 1.60 लाखांचा फोन खरेदी केला

iPhone 15 Series Sales On Apple Store : ऑनलाइन प्री बुकिंग सुरु असणाऱ्या आयफोनसाठी ऑफलाइन विक्री सुरु झाली आहे.
iPhone 15 Series Sale
iPhone 15 Series SaleSaam Tv
Published On

iPhone 15 Series Sale Start :

१२ सप्टेंबरला Apple च्या नवी सीरिज लॉन्च झाली. त्यामुळे आयफोनच्या इतर सीरिजच्या किंमती कमी झाल्या. ऑनलाइन प्री बुकिंग सुरु असणाऱ्या आयफोनसाठी ऑफलाइन विक्री सुरु झाली आहे. म्हणजेच आयफोन खरेदी करायचा असेल तर थेट आता स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.

आयफोन हा केवळ स्टोअरमध्ये मिळणार नाही तर तो इतर रिटेल स्टोअरमधूनही खरेदी करता येणार आहे. अशातच लोकांची आयफोनसाठी असणारी क्रेझ पाहायला मिळत. यापूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी स्वतंत्र असे स्टोअर नव्हते परंतु भारतात दिल्ली आणि मुंबईमधून ग्राहकांना आयफोन खरेदी करता येणार आहे.

iPhone 15 Series Sale
Happy Life Tips: दु:खातही आनंदी राहाण्याची गुरुकिल्ली! या सोप्या टिप्स फॉलो करा

iPhone 15 च्या सीरिजमध्ये चार फोन लॉन्च करण्यात आले आहे. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max. Apple ने यावर्षी बीकेसी, मुंबई आणि साकेत सिलेक्ट सिटी, दिल्ली येथे आपले स्टोअर उघडले आहेत. ('साम टीव्ही'च्या बातम्या आता WhatsAppवर मिळणार, कसं ते जाणून घ्या)

अशातच आयफोनची ऑफलाइन विक्री सुरु झाल्यामुळे कालपासून स्टोअरवर लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. काही वर्षांपूर्वी अशा लांबलचक रांगा अमेरिकेत आणि इतर देशात पाहायाला मिळाल्या होत्या. त्यावेळी देखील आयफोन खरेदी करण्यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र कालातंराने ही क्रेझ कमी होताना दिसली. त्याचे मुख्य कारणं ऑनलाइन खरेदी. परंतु, मुंबई आणि दिल्लीत आयफोनचे स्टोअर उघडल्यापासून लोकांची गर्दी या ठिकाणी देखील पाहायला मिळाली.

1. १७ तास लांबलचक रांग

ANI च्या वृत्तानुसार एका व्यक्तीने सांगितले की, iPhone 15 Pro Max खरेदी करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईत आला होता. २१ तारखेला दुपारी ३ वाजता दुकानात पोहचली असता तब्बल १७ तासांनंतर त्याने आयफोन खरेदी केला.

तर दुसरी एक व्यक्ती आयफोन खरेदी करण्यासाठी एक व्यक्ती पहाटे बेंगळुरुहून मुंबईच्या स्टोअरला फ्लाइटने आली होती. त्यामुळे आजही आयफोनची क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळाली.

2. किंमत किती आहे? 

iPhone 15 च्या सीरिजमध्ये चार नवीन मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. आयफोन 15 च्या बेस व्हेरिएंटची किंमत (Price) 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 15 Plus व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते.

प्रो वेरिएंटबद्दल बोलायचे तर तो खूप महागडा आहे. iPhone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरू होते.

iPhone 15 Series Sale
iPhone 15: iPhone 15 लॉन्च होताच14 झाला इतका स्वस्त, किंमत ऐकून व्हाल अवाक्

3. ऑफर (offer) काय आहेत? 

Apple Store वर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळतील. नवीन फोनवर तुम्ही 6 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर 5 हजार रुपयांची सूट मिळत आहे. iPhone 15 Pro सीरीजवर 6,000 रुपयांची सूट आहे. ही ऑफर HDFC बँकेच्या कार्डांवर उपलब्ध आहे

याशिवाय तुम्ही हा फोन नो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करू शकता. जर तुम्ही हे फोन प्री-ऑर्डर केले असतील तर तुम्ही थेट जाऊन ते खरेदी करू शकाल. ज्यांनी याची प्री-ऑर्डर केलेली नाही त्यांना फोन खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com