सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे आणि बँकांमध्ये 10वी पास तरुणांसाठी मेगा भरती निघाली आहे. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे 10वी पास लोकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जबलपूर येथील रेल्वे आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे.
मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. या पदाला उप कर्मचारी म्हणतात. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी रिक्त जागा आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
10वी पास उमेदवार सेंट्रल बँक इंडियामध्ये सफाई कामगाराच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारही अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार बँकेच्या www.centralbankofindia.co.in या ऑनलाइन वेबसाइटला भेट देऊ शकतात. (Latest Marathi News)
तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वेद्वारे अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 10वी पास असणे अनिवार्य आहे. या पदासाठी अनुभवी उमेदवारही अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार 15 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ ला भेट देऊ शकता किंवा थेट वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करू शकता. अप्रेंटिस पदासाठी 3015 रिक्त जागांची माहिती देण्यात आली आहे. 14 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.