Amit Shah On CAA: आम्ही CAA लागू करणारच; कोणीही रोखू शकत नाही: अमित शाह

Union Home Minister Amit Shah : कोलकतामध्ये झालेल्या एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएएचा मुद्दा उपस्थित केलाय. सरकार हा कायदा लागू करणार आहे. याला कोणीच रोखू शकत नाही, असं शाह म्हणालेत.
Amit Shah On CAA: आम्ही CAA लागू करणारच; कोणीही रोखू शकत नाही: अमित शाह
Published On

Amit Shah On CAA In Kolkata:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएएचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलाय. कोलकतामध्ये झालेल्या एका सभेत बोलताना त्यांनी सीएएचा मुद्दा उपस्थित केला. सरकार नागरीक संशोधन कायदा लागू केल्याशिवाय राहणार नाही, त्याला कोणी रोखू शकत नाही. हा देशाचा कायदा आहे, असं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं.(Latest News)

सभेत नागरिकांना संबोधित करताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या २१२ भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा उल्लेख केला. राज्यात २०२६ मध्ये होणाऱ्या विधानभेच्या निवडणुकीत जनता या हत्येचा बदला घेतील. भाजप पश्चिम बंगालमध्ये २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावाही अमित शाहा यांनी यावेळी केला. यावेळी जनतेला संबोधित करताना शाह यांनी पंतप्रधान मोदींना परत एकदा पंतप्रधान म्हणून निवडणून द्यावे असे आवाहन केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खात्यात इतक्या जागा द्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: म्हटले पाहिजे की, मी पश्चिम बंगालमुळे पंतप्रधान झालो. पश्चिम बंगालमध्ये भविष्यात भाजपची सत्ता आणणायची, असं येथील जनतेने ठरवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या जनतेला खूप सारा पैसा योजनेच्या रुपात देत आहे, परंतु तृणमूल काँग्रेसचे सरकार हा पैसा गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही, असं शाह यावेळी म्हणाले.

Amit Shah On CAA: आम्ही CAA लागू करणारच; कोणीही रोखू शकत नाही: अमित शाह
Uttarkashi Tunnel Rescue Operation : 'हा भावनिक करणारा क्षण'; सर्व ४१ मजूर सुरक्षित बाहेर आल्यानंतर PM मोदींनी व्यक्त केला आनंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com