100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Operation Trident : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन ट्रायडेंट' अंतर्गत ३८ ठिकाणी छापे टाकलेकत आणि १,४२४ बँक खाती गोठवली आहेत.
India operation against international narcotics cartel
India operation against international narcotics cartelsaam tv
Published On: 
Summary
  • आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी नेटवर्कविरोधात संयुक्त कारवाई.

  • आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये २३ ऑक्टोबर रोजी एकाच वेळी छापेमारी.

  • तस्करीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासात महत्त्वाची कारवाई.

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी नेटवर्कला मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. याअंतर्गत केंद्र सरकारने 'ऑपरेशन ट्रायडेंट' सुरू केलं असून याअंतर्गत आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार २३ ऑक्टोबर रोजी या तीन राज्यांमधील ३८ ठिकाणी ३८ पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांना आणि त्यांच्या आर्थिक जाळ्याला उद्ध्वस्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

अंमली पदार्थांच्या नेटवर्कवर हल्ला

केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं की, 'ऑपरेशन ट्रायडेंट' हे अंमली पदार्थांबाबत केंद्र सरकारच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाच्या सुसंगत राबवण्यात आले. या मोहिमेला केवळ बेकायदेशीर पदार्थांच्या जप्तीपुरते मर्यादित न ठेवता, त्याद्वारे संपूर्ण तस्करीच्या जाळ्यातील आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या साथीदारांवर कारवाई केली जाणार आहे.

तीन राज्यांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या बहु-संस्थात्मक कारवाईचं लक्ष्य आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ-आर्थिक सिंडिकेट्स म्हणजेच अमली पदार्थांची तस्करी आणि त्याशी संबंधित बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांत गुंतलेले गुन्हेगारी गट उघडकीस आणणं होतं.

अमित शाह या कारवाईबाबत काय म्हणाले?

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे या मोहिमेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारची अमली पदार्थांविरुद्धची कठोर कारवाई सुरूच आहे. शहा यांच्या माहितीनुसार २३ ऑक्टोबर रोजी विविध तपास यंत्रणांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूरमधील ३८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलीत. एका आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी टोळीचा पर्दाफाश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com