Cough Syrups : २ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; मृत्यूतांडवानंतर केंद्र सरकारची अ‍ॅडव्हायजरी!

Central Government : मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांत कफ सिरप प्यायल्याने लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. खरंच कफ सिरपने मुलांचा झाला आहे का? याचा आरोग्य यंत्रणा तपास करत आहे.
Cough Syrups
Cough Syrupsx
Published On
Summary
  • मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने १२ हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय.

  • केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याच्या सूचना जारी केल्या.

  • सिरपच्या नमुन्यांत घातक रसायनांचे अंश आढळले नाहीत, तपास सुरू आहे.

Central Government Advisory Cough Syrups : बंदी असलेले कफ सिरप प्यायल्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये १२ हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने एक निवेदन जारी केले आहे. यात दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दी सिरप देऊ नये असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने बालरुग्णांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल एक सल्लागार जारी केला आहे.

दोन वर्षांखालील मुलांना खोकला-सर्दी यांची औषधे देऊ नयेत. साधारणपणे ५ वर्षांखालील मुलांसाठी कफ सिरपची शिफारस केली जात नाही. कोणत्याही औषधांचा वापर काळजीपूर्वक मूल्यांकन, बारकाईने देखरेख आणि योग्य डोसचे काटेकोर पालन, किमान प्रभावी कालावधी यांच्यासह अनेक औषधांच्या संयोजन आधारित असावा असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Cough Syrups
Crime : हत्येचा Live Video! १२ सेकंदात झाडल्या ३ गोळ्या, बाईकवरुन पळताना Reel सुद्धा बनवली

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदी घातलेल्या कफ सिरपचे सेवन केल्याने १२ हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला. यांपैकी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मृतांची संख्या नऊ झाली आहे. सुरुवातीच्या चाचण्यामध्ये सिरपच्या नमुन्यांमध्ये डीईजी किंवा ईजीचे कोणतेही अंश आढळले नाहीत. हे अंश मूत्रपिंडांवर परिणाम करु शकतात.

Cough Syrups
Bhiwandi Crime : भक्षकच! चिमुरडीचे शोषण केल्यानंतर अटक, २ महिन्यांपूर्वी कोर्टातून पळाला अन् पुन्हा अत्याचार करुन लहान मुलीला संपवलं

बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. पवन नांदुरकर यांनी सांगितले की, मृतांची संख्या नऊवर गेली आहे. कोल्ड्रिफ नावाच्या कफ सिरपमुळे मूत्रपिंडाची दुखापत आणि त्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मूत्रपिंडाला इतर कारणांमुळेही दुखापत झाली असू शकते. तोपर्यंत कोल्ड्रिफ आणि नेस्टो डीएस कफ सिरपची विक्री थांबवण्यात आली आहे.

Cough Syrups
26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे लहान मुलांच्या मृत्यूनंतर गोळा करण्यात आलेल्या कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये अधिकाऱ्यांना कोणताही अशुद्धता आढळली नाही. त्यात मूत्रपिंडाचे नुकसान करणारे डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) किंवा इथिलीन ग्लायकोल (ईजी) चे अंशही आढळले नाहीत. त्यामुळे मुलांच्या मृत्यूला कफ सिरप कारणीभूत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूमागील खरे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची टीम पाणी, डासांद्वारे पसरणारे आजार आणि श्वसनाशी संबंधित नमुन्यांचीही तपासणी करत आहे. या तपासासाठी NCDC, NIV, CDSCO आणि इतर संस्थांची संयुक्त टीम स्थापन करण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी जाऊन राज्य अधिकाऱ्यांसोबत विविध नमुने गोळा केले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Cough Syrups
Kidnapping : निर्जन रस्ता, मिट्ट काळोख, ट्रक रिव्हर्स घेतला; ड्रायव्हरनं महिलेला उचललं अन्..; अपहरणाचा थरारक Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com