CBSE Class 10th,12th Board Exams : विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा! CBSE कडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

CBSE Board Exams : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनकडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती cbse.gov.in. या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीय.
CBSE Board Exams
CBSE Board ExamsANI File
Published On

CBSE Class 10th,12th Board Exams Time Table :

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १३ मार्च रोजी संपेल. तर इयत्ता १२ वीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २ एप्रिल २०२४ ला संपतील. परीक्षेच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती cbse.gov.in. या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीय. (Latest News)

गेल्या वर्षीही सीबीएसईने (CBSE) डिसेंबरमध्येच वेळापत्रक जाहीर केलं होतं. मागील वर्षी बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून परीक्षा(Exam) सुरू झाल्या होत्या. तर १०वीच्या अंतिम परीक्षा २१ मार्चला संपल्या आणि १२ वीच्या परीक्षा ५ एप्रिलला संपल्या होत्या. मागील शैक्षणिक वर्षासाठी CBSE इयत्ता १०, १२ चे निकाल १२ मे २०२३ रोजी घोषित करण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०२२-२३ मध्ये एकूण ३८,८३,७१० विद्यार्थ्यांनी १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण विद्यार्थ्यांपैकी २१,८६,९४० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात बारावीच्या परीक्षेसाठी १६,९६,७७० विद्यार्थी (Students) बसले होते.

CBSE Board Exams
SSC-HSC Exam News: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावी-बारावीच्या आज होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com