Madhya Pradesh Accident
Madhya Pradesh AccidentSaam Tv

Madhya Pradesh Accident: ट्रक-कारच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू; काँग्रेस नेत्याचा पुतण्या जखमी

मध्य प्रदेशातील सागरमध्ये काल रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला.
Published on

MP Accident News Today: मध्य प्रदेशातील सागरमध्ये काल रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सानोधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामोरी डूंडर गावाजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्ण चक्काचूर झाला. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Accident
Kedarnath Mobile Ban: केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी; रील बनवण्यावर, फोटो क्लिक करण्यावरही बंदी

त्याचवेळी ट्रकचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाला. स्थानिक पोलिसांना (Police) अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातातील (Accident) जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले तर एक जखमी आहे. चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अपघात झाला त्यावेळी कारमध्ये 7 तरुण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी अतुल दुबे यांच्या मालकीची आहे. यामध्ये त्यांचा मुलगा अमरदीप गंभीर जखमी झाला. अमरदीप हा काँग्रेस नेते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष अमित दुबे यांचा पुतण्या आहे. जखमी अमरदीपला सागर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (MP Accident)

मृत व्यक्तींची नावे

मुकेश रकवार (28), पंकज रकवार (35), ब्रजेश ठाकूर (30), अर्पित जैन (30), गणेश रकवार (45), पवन रकवार (35) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यापैकी अर्पित जैन हा अंकुर कॉलनी, मकारोनिया आणि उर्वरित पूर्व तोरी सागर येथील रहिवासी आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com