Kedarnath Mobile Ban: केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी; रील बनवण्यावर, फोटो क्लिक करण्यावरही बंदी

Kedarnath Big News: पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे.
Kedarnath
Kedarnath Saam Tv
Published On

Kedarnath Mobile Ban News: पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच मंदिर परिसरात फोटो आणि व्हिडिओ बनवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही. (Latest Marathi News)

Kedarnath
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच; नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण

काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमुळे या धार्मिक स्थळाची पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत.

श्री बद्रीनाथ-केदारनाथ (Kedarnath) मंदिर समितीने मंदिर परिसरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत, ज्यावर मंदिराच्या आवारात मोबाईल (Mobile) फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिरात कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई आहे, तुम्ही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या सूचना फलकांमध्ये सांगण्यात आले आहे.

Kedarnath
Shocking Flight Pilot News: विमान हजारो फूट उंचीवर, अचानक पायलटची तब्येत बिघडली अन्... थरकाप उडवणारी घटना

इतकेच नाही तर मंदिर समितीने केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना ‘सभ्य कपडे’ परिधान करण्यास सांगिले आहे. तसेच मंदिर परिसरात मंडप किंवा छावण्या न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मंदिराच्या आवारातील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील फलकांवरही लिहिले आहे.

केदारनाथ मंदिरात बनवलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Socail Media) प्रसारित झाले होते, ज्याबद्दल यात्रेकरू, सामान्य भाविक आणि सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला होता आणि धार्मिक स्थळांमधील अशा कृत्यांचा निषेध केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com