Viral Video: कपलने मर्यादा सोडल्या; बसच्या मागच्या सीटवर अश्लील चाळे; खुल्लमखुल्ला किस करतानाचा VIDEO व्हायरल

Couple's Bus Kiss Video: एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये दोघं बसच्या मागच्या सीटवर बसून एकमेकांना मिठी मारताना आणि किस घेताना दिसत आहेत.
Viral Video
Viral VideoSaam
Published On

सोशल मीडियावर काय आणि कधी व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. अशाच एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये दोघं बसच्या मागच्या सीटवर बसून एकमेकांना मिठी मारताना आणि किस घेताना दिसत आहेत. कुणीतरी हा व्हिडिओ गुपचूप शूट केला आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हा व्हिडिओ बसमधीलच एका प्रवाशाने गुपचूप शूट करून २७ मे रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये विद्यार्थी गणवेशात दिसून येत आहे. बसच्या मागच्या सीटवर बसून कपल खुल्लमखुल्ला किस करताना दिसत आहे. तसेच मिठी मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठल्या राज्यातील किंवा शहरातील आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Viral Video
Amravati: “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं” वडिलांची परिस्थिती बिकट अन्.. दहावीत ९६ टक्के मिळवणाऱ्या तरूणीची आत्महत्या

नेटकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनाचा निषेध केला आहे, तर काहींनी व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं.

Viral Video
Shocking : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर बेछूट गोळीबार, भाषण करताना डोक्यावर धडाधड ३ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "हो त्यांनी चूक केली असेल, पण तो क्षण व्हिडिओ करून सगळ्यांसमोर मांडणं गरजेचं होतं का?" अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली. तर आणखी एकाने, "सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनावर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com