Budget Session: अर्थसंकल्प नवा विश्वास निर्माण करेल; गरीब- मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहिल: PM मोदी

PM Narendra Modi: अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाबाहेर देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी या ' यंदाचा अर्थसंकल्प नवा विश्वास निर्माण करेल.', असे सांगितले.
Budget Session: बजेट नवा विश्वास निर्माण करेल; गरीब- मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहिल: PM मोदी
Pm ModiSaam Tv
Published On

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाबाहेर देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी 'उद्याचा अर्थसंकल्प नवा विश्वास निर्माण करेल. अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होईल. २०२४ मध्ये भारत विकसित झालेला असेल.', असे पीएम मोदींनी सांगितले.

पीएम मोदी म्हणाले की, 'आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला मी समृद्धीची देवी लक्ष्मीला वंदन करतो. याप्रसंगी लक्ष्मी देवीच्या गुणांचे स्मरण आपल्या देशात शतकानुशतके केले जाते. माता लक्ष्मी आपल्याला सिद्धी आणि बुद्धी देते. तसेच समृद्धी आणि कल्याण देते. मी प्रार्थना करतो की देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समाजाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी.'

Budget Session: बजेट नवा विश्वास निर्माण करेल; गरीब- मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहिल: PM मोदी
Union Budget 2025: करदात्यांसाठी आनंदाची बातमी, ITR भरण्याची मुदत वाढू शकते? नक्की खरं काय ?

पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'यावर्षी आपल्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. देशातील जनतेने मला तिसऱ्यांदा ही जबाबदारी दिली आहे. या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे आणि मी विश्वासाने सांगू शकतो की, २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होणार आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल तेव्हा देश विकसित झालेला असेल. आम्ही सर्व प्रकारे जनतेच्या कल्याणासाठी मिशन मोडवर काम करत आहोत.'

Budget Session: बजेट नवा विश्वास निर्माण करेल; गरीब- मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहिल: PM मोदी
Budget 2025: मेट्रो शहरांमध्ये सामान्यांसाठी घर घेणं अजूनही महागच; यंदाच्या बजेटमध्ये स्वप्न पूर्ण होईल का?

तसंच, 'बजेट सत्रामध्ये सर्व खासदार विकसित भारताला मजबूत करण्यासाठी आपले योगदान देतील. विशेष करून युवा खासदारांसाठी हा सुवर्णक्षण आहे. त्यांना या अधिवेशनात चांगला अनुभव मिळेल. देशाच्या आशा -आकांक्षासाठी आपण या बजेट सत्रामध्ये प्रयत्न करूया. या अधिवेशनात महिलांसाठी मोठा निर्णय होणार आहे.'

Budget Session: बजेट नवा विश्वास निर्माण करेल; गरीब- मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहिल: PM मोदी
Budget 2025: १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com