Budget 2025: १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Gold Price Will Be Increase: अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या किमतीवरील कराबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये सरकार सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवू शकते. त्यामुळे सोनं देखील महाग होण्याची शक्यता आहे.
Budget 2025:  १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Gold PriceSaam Tv
Published On

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघे ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त होणार? काय महाग होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या किमतीवरील कराबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये सरकार सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवू शकते.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ते ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सरकार सोन्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. सरकार सोन्यावरील आयात शुल्क म्हणे कस्टम ड्युटी वाढवण्याच्या तयारीत आहे. जर १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा झाली तर सोन्याची आयात महाग होईल. त्यामुळे सोन्याचा भाव देखील आणखी वाढू शकतो.

Budget 2025:  १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Budget 2025: पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी होणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

मागच्या वर्षी म्हणजे जुलै २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के केले होते. आयात शुल्कातील ९ टक्के कपात ही आयात शुल्कातील आतापर्यंतची सर्वात मोठी कपात होती. तर २०१३ नंतर पहिल्यांदाच आयात शुल्क १० टक्क्यांच्या खाली आले.

Budget 2025:  १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांना मिळणार मोठा दिलासा! महिला सन्मान योजनेत गुंतवणूकीला मुदतवाढ देण्याची शक्यता

या आयात शुल्कात घट झाल्यानंतर सोन्याची आयात वाढली. पण रत्ने आणि दागिन्यांची निर्यात अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये सोन्याची आयात जवळपास १०४ टक्क्यांनी वाढून १०.०६ अब्ज डॉलर झाली. तर याच कालावधीत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात २३ टक्क्यांहून अधिक घसरली.

Budget 2025:  १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात कर कपातीवर होणार निर्णय, मध्यमवर्गीयांना मोदी सरकार देणार मोठी भेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com