
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सलग आठव्यांदा बजेट सादर केला. मोदी सरकारने अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारने ७ लाख ते १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर मोठी सूट दिली. भाजप आणि सहकारी नेत्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरून मोदी सरकार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने गोळीचा घाव दिला. त्यानंतर त्याच घावावर मलमपट्टी केली, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर तोफ डागली.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'आधी गोळीने घाव घातला, त्यानंतर मलमपट्टी लावली आहे'. 'आर्थिक संकट दूर करण्यासाठी मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे, असेही ते पुढे म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, 'एक म्हण या अर्थसंकल्पावर शोभते. 'नौ नौ चूहे खाकर बिल्ली हज को चली', अशा शब्दात खरगे यांनी टीका केली. 'आज देश बेरोजगारी आणि महगाईच्या झळा सोसत आहे. पण मोदी सरकार लोकांमध्ये खोटं कौतुक पसरवत आहे. मागील १० वर्षांत सरकारने मध्यमवर्गीयांकडून कोट्यवधींचा कर वसूल केला आहे. मात्र, आता १२ लाखांवर सूट देत आहे'.
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, 'अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं म्हणणं आहे की, वर्षभरात ८० हजार रुपयांची बचत होईल. याचा अर्थ महिन्याला ६६६६ रुपयांची बचत होईल. घोषणावीर अर्थसंकल्पात त्रूटी लपवण्यासाठी मेक इन इंडियाच्या नॅशनल मॅन्यूफॅक्चरिंग मशीन तयार केली आहे'.
दरम्यान, काँग्रेसने केंद्रीय अर्थसंकल्पावरून जोरदार टीका केली. काँग्रेसने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशकडे डोळेझाक केल्याची टीका केली आहे. काँग्रेसने बिहारला भरभरून दिल्याची टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.