Buddhism: बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही, धर्मांतर करण्याआधी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक; गुजरात सरकार

Buddhism Gujarat govt : बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे. तसेच हिंदू धर्मातून बौद्ध, जैन, शीख किंवा इतर धर्मात धर्मांतर करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची संमती घेणं गरजेचं असल्याचं गुजरात सरकारने म्हटलंय.
 Buddhism: बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही, धर्मांतर करण्याआधी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक; गुजरात सरकार
Published On

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Gujarat Govt Circular For Buddhism :

गुजरात सरकारने बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी नवीन परिपत्रक जारी करत नवीन नियम लागू केलाय. बौद्ध धर्म हा वेगळा धर्म असून त्याचा हिंदू धर्माशी संबंध नसल्याचं गुजरात सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटलंय. गुजरात सरकारच्या या नव्या नियमानुसार, ज्या कोणी व्यक्तीला बौद्ध धर्मात धर्मांतर करायचे असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल. तसेच धर्मांतर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना एका महिन्याआधी द्यावी लागेल.(Latest News)

दरम्यान गुजरातमध्ये धर्मांतरासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा, 2003 च्या तरतुद आहे. यानुसार, हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख तसेच इतर धर्मात धर्मांतर करण्यासाठी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. दरम्यान बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांच्या अर्जांवर नियमानुसार कार्यवाही होत नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर गुजरात राज्याच्या गृह विभागाने ८ एप्रिल रोजी हे परिपत्रक जाहीर केले होते.

परिपत्रकावर उपसचिव (गृह) विजय बधेका यांनी स्वाक्षरी आहे. गुजरातमध्ये दरवर्षी दसरा आणि इतर सणांना आयोजित कार्यक्रमांमध्ये बहुतांश दलित मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत असल्याचं दिसून आले आहे.

"ज्या धर्मांतर प्रकरणांमध्ये पूर्वपरवानगी मागून अर्ज दाखल केले जातात. त्या संबंधित कार्यालये असे अर्ज निकाली जात आहेत. परंतु अनेक प्रकरणात अर्जदाराने दाखल केलेल्या अर्जात घटनेच्या कलम 25(2) नुसार शीख, जैन आणि बौद्ध धर्म हिंदू धर्मात समाविष्ट असल्याचं म्हटलंय. यामुळे धर्मांतर करताना अर्जदाराला परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं, असं धर्मांतर परिपत्रकात म्हटलंय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, जिल्हा दंडाधिकारी कार्यालये मनमानीपणे गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याचा अर्थ लावला जातोय. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जांमध्ये नियमानुसार प्रक्रिया पाळली जात नसल्याचे गृहविभागाच्या निदर्शनास आले आहे. बऱ्याचवेळा हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी, पूर्व परवानगी आवश्यक नसल्याचं अर्जदार आणि स्वायत्त संस्थांकडून सांगितलं जातं.

"गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या संदर्भात, बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला जाईल, असं परिपत्रकात म्हटलंय. या कायद्यानुसार ज्या व्यक्तीला हिंदू धर्मातून बौद्ध, शीख, जैन धर्मात धर्मांतरित करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस विहित नमुन्यात जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसेच धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला विहित नमुन्यात जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे.

तसेच कायदेशीर तरतुदींचा सविस्तर अभ्यास करून आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून धर्मांतराच्या अर्जावर निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच कायदेशीर तरतुदींचा सविस्तर अभ्यास करून आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून धर्मांतराच्या अर्जावर निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिलेत

गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भात स्पष्टीकरण म्हणून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. “काही जिल्हा दंडाधिकारी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्याच्या अर्जाचा निर्णय घेताना कायदा आणि त्याच्या नियमांचा चुकीचा अर्थ लावत होते. तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावर मार्गदर्शन मागवले होते. म्हणून, आम्ही या परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे.

 Buddhism: बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही, धर्मांतर करण्याआधी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक; गुजरात सरकार
PM Modi: लोकशाही केवळ आपल्या राज्यघटनेतच नाही तर भारतीयांच्या रक्तात: पंतप्रधान मोदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com