PM Modi: लोकशाही केवळ आपल्या राज्यघटनेतच नाही तर भारतीयांच्या रक्तात: पंतप्रधान मोदी

PM Modi : पंतप्रधान मोदीने न्यूजवीकला दिलेल्या मुलखातीत देशातील लोकशाही, अल्पसंख्याकांची स्थिती, भारत-चीन वादावर भाष्य केलं आहे.
PM Modi On Democracy
Prime Minister Narendera Modi ANI
Published On

Prime Minister Narendera Modi Interview:

भारतातील लोकशाही केवळ आपल्या राज्यघटनेतच नाही तर भारतीय लोकांच्या रक्तात आहे. आपल्या देशात, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा पारशी हे सर्व धर्माचे अल्पसंख्याक समुदायातील लोक सर्व आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.(Latest News)

अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक NEWSWEEK कडून पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतातील लोकशाही धोक्यात आहे का? असा प्रश्न केला होता. अमेरिकन मासिकाकडून करण्यात आलेल्या या प्रश्नावर पीएम मोदींनी वरील उत्तर दिलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे दुसरे पंतप्रधान आहेत, ज्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक NEWSWEEK ने कव्हर पेजवर स्थान दिले आहे. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणूक, राम मंदिर, अल्पसंख्याकांची सद्यस्थिती आणि चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी सविस्तर चर्चा केली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणीय समस्या, चीनसोबतचे भारताचे संबंध आणि प्रेस स्वातंत्र्यावर होत असलेली कथित कपात याविषयांवर मोदींनी या मुलाखतीत भाष्य केलं. आश्वासने पूर्ण करण्याचा आमचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. लोकांसाठी ही मोठी गोष्ट आहे, कारण त्यांना कधीही पूर्ण न होणारी आश्वासने ऐकण्याची सवय होती. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" हे ब्रीदवाक्य घेऊन आमच्या सरकारने कामे केल्याचं मोदी म्हणाले.

आमच्या योजनांचा फायदा इतर कोणाला झाला असेल तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असा विश्वास आहे. भारत ११व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून ५व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत गेल्याचे लोकांनी पाहिले आहे. आता भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हावी, अशी देशाची आकांक्षा असल्याचं मोदी यावेळी म्हणालेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकशाहीवरून आपलं मत मांडलं. भारतातील लोकशाही धोक्यात आहे असा असा प्रश्न मोदींना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलंय.

देशात लोकशाही आहे हे केवळ राज्यघटना आहे म्हणून म्हणत नाही. तर लोकशाही आपल्या जनुकांमध्ये रक्तामध्ये आहे भारतात लोकशाही आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. तामिळनाडूमधील उत्तरमेरूरमधील आपण भारताच्या लोकशाही मूल्यांबद्दल ११०० ते १२०० वर्षे जुन्या शिलालेखात देखील याचं वर्णन असल्याचं ते म्हणालेत.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०० दशलक्षहून अधिक लोकांनी मतदान केले. आता काही महिन्यांत ९७० दशलक्षाहून अधिक पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावतील. संपूर्ण भारतात १० लाखांहून अधिक मतदान केंद्रे बांधली जातील. मतदारांचा सातत्याने वाढणारा सहभाग हा भारतीय लोकशाहीवरील लोकांच्या विश्वासाचा मोठा पुरावा असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

PM Modi On Democracy
Pm Modi On China: चीनशी संबंध महत्त्वाचे, पण आधी सीमावाद सोडवायला हवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com