Wagah-Attari Border: वाघा-अटारी बॉर्डरवर बिटिंग रिट्रीटमध्ये भारताच्या जवानांनी दाखवला जोश; अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

Wagah-Attari Border: बिटिंग रिट्रीट सोहळ्यात भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवलं. या सोहळ्यात महिला जवानांचाही सहभाग पाहायला मिळाला.
Wagah-Attari Border:
Wagah-Attari Border:Saam tv
Published On

Wagah-Attari Border: वाघा-अटारी बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तानी आणि भारतीय नागरिक प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. दोन्ही देशातील नागरिक स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वाघा-अटारी बॉर्डरवर येतात. यंदाही भारतीयांनी वाघा-अटारी बॉर्डरवर बिटिंग रिट्रीट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. बिटिंग रिट्रीट सोहळ्यात भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवलं. या सोहळ्यात महिला जवानांचाही सहभाग पाहायला मिळाला. (Latest Marathi News)

वाघा-अटारी बॉर्डरवरील बिटिंग रिट्रीट या सोहळ्यात बीएसफचे जवान आणि पाकिस्तानकडून पाक रेंजर्स सहभागी होतात. दरवर्षी या कार्यक्रमात पुरुषांचा दबदबा पाहायला मिळतो. मात्र, यंदा बीएसएफच्या महिला जवानांनीही सहभाग नोंदवला होता. या सोहळ्याला १९५९ पासून सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात भारतीयांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या.

Wagah-Attari Border:
Tomato Price Drop: नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचं मोठं गिफ्ट; आता टोमॅटो ५० रुपये किलोनं मिळणार, कुठे? वाचा सविस्तर

वाघा-अटारी बॉर्डर येतात दोन्ही देशातील सैनिक

या सोहळ्यासाठी दोन्ही देशातील हजारो लोक या ठिकाणी पोहोचतात. वाघा-अटारी बॉर्डरवर दोन्ही लोक देशभक्तीपर घोषणा देतात. बिटिंग रिट्रीट सोहळा हा २ तासांचा असतो. बिटिंग रिट्रीट सोहळा झाल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमेवरील द्वार (Gate) बंद केले जातात. त्याचबरोबर सूर्यास्ताच्या आधीच राष्ट्रीय ध्वज खाली उतरवले जातात .

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले देशाला संबोधित

भारतात आज सर्वत्र मोठ्या उत्साहात ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा झाला.लाल किल्ल्यावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी जनतेला संबोधित केले. तसेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं मोदींनी म्हटलं.

Wagah-Attari Border:
77th Independence Day: PM मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिली 5 मोठी आश्वासने, म्हणाले...

लाल किल्ल्यावरील भाषणात PM मोदींचाच सर्वाधिक रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन दहाव्यांदा देशाला संबोधित केलं आहे. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून १० वेळा भाषण केलं आहे. यंदा नरेंद्र मोदी यांनी ५६ मिनिटांचे भाषण दिलं. मोदी यांचं लाल किल्ल्यावरील सर्वात लहान भाषण होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com