Viral Video : नवरा-नवरीचा स्टेजवरच धुमाकूळ, एकमेकांना कानफटवलं; हसून-हसून रडाल!

नवऱ्या मुलाने नवरीला जबरदस्तीने मिठाई खाऊ घातल्यानंतर त्यांचे भांडण सुरू झाले.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

Viral Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही खास करत असतो. अनेक लग्नांचे व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत भारी वाटतं. मात्र लग्नांचे काही मजेदार व्हिडीओही पाहायला मिळतात.

अनेक लग्नांमंध्ये मानपानावरुन नातेवाईकांचे रुसवे फुगवे सुमोर येतात. तर काही लग्नांमध्ये हे वाद मारहाणीपर्यंतही पोहोचतात. पण लग्नात नवरा-नवरीमध्येच भांडण झालेलं फारच क्वचित पाहायला मिळेल. असाच वधू-वराचा भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. (Viral Video)

Viral Video
Viral Video : पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव ट्रकमधून चालकाने मारली उडी; यानंतर घडलेले थरारनाट्य कॅमेरात कैद

व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. नवऱ्या मुलाने नवरीला जबरदस्तीने मिठाई खाऊ घातल्यानंतर त्यांचे भांडण सुरू झाले. वराने जबरदस्तीने मिठाई भरवणे वधूला अजिबात आवडलं नाही. (Latest Marathi News)

चिडलेली नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या हात सोडवून त्याला जोरात मारहाण करायला सुरुवात करते. सर्वांसमोर मारहाण झाल्याने नवऱ्या मुलालाही राग येतो आणि तो वधूला देखील मारहाण करतो. यानंतर स्टेजवर जे घडलं त्यावरुन तुम्हाला हसू कन्ट्रोल होणारच नाही.

Viral Video
Punjab : गव्हाच्या पोत्याची चोरी रंगेहाथ पकडली; ट्रक चालकाने चोराला दिली क्रूर शिक्षा, Video Viral

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या आयडीवरून हा मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 31 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com