Punjab : गव्हाच्या पोत्याची चोरी रंगेहाथ पकडली; ट्रक चालकाने चोराला दिली क्रूर शिक्षा, Video Viral

पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यात एका युवकाला ट्रकच्या बोनेटला बांधून शहरभर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
punjab crime news
punjab crime news Saam tv
Published On

Punjab Crime News : पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यात एका युवकाला ट्रकच्या बोनेटला बांधून शहरभर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकाने चालू ट्रकमधून दोन गव्हाची पोती चोरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ट्रक चालकाने त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर ही शिक्षा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. (Latest Marathi News)

punjab crime news
Shivsena News: शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; रस्त्यावरील फ्रीस्टाईल हाणामारीचा Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार ( ११, डिसेंबर) च्या सायंकाळी हा प्रकार घडला असून संबंधित युवक चालू ट्रकमधून गव्हाची पोती चोरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ड्रायव्हरने त्याला रंगेहाथ पकडले आणि त्याचा हा प्रयत्न फसला. चोरीच्या प्रयत्नानंतर या युवकाला ट्रक ड्रायव्हरने पोलिसांच्या ताब्यात न देता ट्रकच्या बोनेटला बांधून संपूर्ण शहरात फिरवले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.

चोरी करणाऱ्या युवकाला बोनेटला बांधून ट्रकचा क्लिनर त्याला पकडून बसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर याने गव्हाची दोन पोती चोरली असून त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेत असल्याचेही तो क्लिनर सांगत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी दखल घेत दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

पंजाबचे पोलिस अधिकारी जगदीश कुमार यांनी याबद्दल व्हायरल व्हिडिओच्या आधारे कारवाई केली जाणार असून कायदा हातात घेणाऱ्यांना कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.त्याचबरोबर चोराला पकडल्यानंतर तात्काळ पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते असेही ते म्हणाले.

दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. "पंजाबमध्ये सुरू झाली तालिबानी सजा", असेही काही नेटकऱ्यांनी म्हणले आहे.

Edited By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com