K. Kavitha: लोकसभेच्या तोंडावर BRSला धक्का! के. कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Delhi Scam News: कोर्टाने के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर बीआरएसला मोठा धक्का बसला आहे.
Delhi Excise Policy Case:
Delhi Excise Policy Case: Saamtv

K. Kavitha News:

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर राऊस ॲव्हेन्यू कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावण्यात कोर्टाने के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर बीआरएसला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता सध्या ईडी कोठडीत आहेत. ४ एप्रिल रोजी कविता यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी पार पडली होती. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.

आज कोर्टाने याप्रकरणाचा निकाल दिला असून के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे कविता यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर बीआरएसला मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

Delhi Excise Policy Case:
Nashik Loksabha: नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला! भाजपकडून पुन्हा सर्वेक्षण; नव्या ३ नावांची चर्चा

दरम्यान, के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांची बाजू मांडली होती. ज्यामध्ये सिंधवी यांनी पीएमएलएचे कलम ४५ आणि महिलांना अपवाद असलेल्या तरतुदीचा उल्लेख केला होता. सिंघवी यांनी 'मुल मांडीवर आहे किंवा लहान आहे असे नाही, ते 16 वर्षांचे आहे. पण इथे मुद्दा वेगळा आहे. हा आईचा तिच्या मुलासाठी नैतिक आणि भावनिक आधाराचा मुद्दा आहे. के. कविता यांच्या अटकेमुळे मुलावर आधीच मानसिक आघात झाल्याचा युक्तीवाद केला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Excise Policy Case:
Nagpur Crime News : सिगारेट ओढण्यावरून वाद; तरुणी आणि तिच्या मित्रांकडून तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com