Delhi News: दिल्ली मद्य घोटाळा: बीआरएस नेत्या के कविता यांनी आप नेत्यांना १०० कोटी दिले; ईडीचा गंभीर आरोप

Delhi Excise Policy Case: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता ईडीने गंभीर आरोप केले असून के कविता या दारु घोटाळ्याच्या मद्य धोरणात फायदा मिळवण्यासाठी कट रचला होता.
Delhi Excise Policy Case:
Delhi Excise Policy Case: Saamtv
Published On

ED On K Kavita:

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता ईडीने गंभीर आरोप केले असून के कविता या दारु घोटाळ्याच्या मद्य धोरणात फायदा मिळवण्यासाठी कट रचला होता. यासाठी त्यांना 100 कोटी रुपये दिले होते असे म्हटले आहे. कविता यांच्या अटकेनंतर ईडीने या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केले आहे.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांच्याविरोधात दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्या प्रकरणी २ खटला करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. हवालाद्वारे पैशांच्या व्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तपास करत आहे.

या प्रकरणी आता ईडीने मोठा दावा केला असून दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामध्ये लॉबी मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत होती. या प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या सहकार्याने 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा केंद्रीय एजन्सीचा आरोप आहे. ईडीच्या आरोपामुळे के कविता यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Delhi Excise Policy Case:
Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम, शिवसेना १६ जागांवर ठाम

तसेच २०२१-२२ च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात त्यांची मोठी भूमिका होती. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणांतर्गत मोठा बाजार हिस्सा मिळविण्यासाठी AAP ला सुमारे १०० कोटी रुपयांची लाच कविता यांनी दिले होतं. के कविता या कथित मद्यविक्रेत्यांच्या 'साउथ ग्रुप' चे प्रतिनिधित्व करत होते असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Delhi Excise Policy Case:
Kolhapur News: भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; केंद्र सरकारनेही घेतली घटनेची दखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com