Accident News: देवदर्शनासाठी निघाले, वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Uttarakhand Accident News: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली. या घटनेत एकाच गावातील ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Uttarakhand Accident News
Uttarakhand Accident NewsANI/Twitter

Uttarakhand Car Accident News

उत्तराखंडच्या बागेश्वर परिसरात रविवारी (ता. १४) पहाटे ५ वाजेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली. या घटनेत एकाच गावातील ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. (Breaking Marathi News)

Uttarakhand Accident News
Content Creators: शुटिंग करताना वाद गेला टोकाला; रागातून YouTuber जोडप्यानं ७ व्या मजल्यावरून घेतली उडी

कमल प्रसाद (वय २६) नीरज कुमार (वय २५) दीपक आर्य (वय २२) कैलाश राम (२५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची (Accident News) माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं.

चारही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हे एकाच गावातील रहिवासी आहेत. गावात धार्मिक पूजा असल्याने ते सरयू नदीतून गंगाजल आणण्यासाठी कारने बागेश्वरला जात होते.

रविवारी पहाटे त्यांची कार बालीघाट-धरमघर परिसरातील चिरांगजवळ आली असता, अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या घटनेत कारमधील चारही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेले नीरज आणि दीपक हे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uttarakhand Accident News
Bhandara Accident: भरधाव ट्रॅकच्या धडकेत शिक्षिका ठार, भंडारा जिल्ह्यात हळहळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com