Content Creators: शुटिंग करताना वाद गेला टोकाला; रागातून YouTuber जोडप्यानं ७ व्या मजल्यावरून घेतली उडी

Content Creator Couple : सोशल मीडिया कटेंट क्रिएट करणाऱ्या एका जोडप्याने एका उच्चभ्रु इमारतीच्या ७ मजल्यावरून घडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या जोडप्याने टोकाचे पाऊल का उचलले याचं कारण अद्याप कळू शकलेले नाहीये.
Content  Creator Couple  haryana
Content Creator Couple haryanarediff

Delhi Social Media Content Creator : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने एका उच्चभ्रू अपार्टमेंटच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. ही घटना हरियाणातील बहादूरगडमध्ये घडलीय. गरवीत ( वय २५), आणि नंदिनी, (वय २२ ) असे या जोडप्याचे नाव असल्याची माहिती मिळालीय. हे दोघेही कंटेंट क्रिएटर होते. ते स्वतःचे चॅनल चालवत होते आणि YouTube आणि Facebook सारख्या प्लॅटफॉर्मसाठी लघुपट तयार करायचे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हे जोडपे त्यांच्या टीमसह डेहराडूनहून बहादूरगडला गेले होते. त्यांनी रुहेला रेसिडेन्सीच्या सातव्या मजल्यावर एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथे ते त्यांच्या पाच सहकाऱ्यांसह राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या जोडप्याने आत्महत्या केली.

शूटिंगनंतर ते उशिरा घरी परतले होते. एका कुठल्यातरी मुद्द्यावरून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्याच वादातून या जोडप्याने ७ मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत.

या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी एक फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित होती. या जोडप्याने हे पाऊल का उचलले याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा केलेत. घटनेपर्यंतचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. 'आम्ही या घटनेचा तपास करत असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे या प्रकरणाचे तपास अधिकारी जगबीर यांनी माध्यमांना सांगितले.

Content  Creator Couple  haryana
Dhule Crime News : धुळे हादरलं! रस्त्यावरच पतीने गळा चिरून पत्नीला संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com