Brazil Plane Crash News : ब्राझीलमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू

Plain Crash : ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा अपघात झाला.
Brazil Plane Crash News
Brazil Plane Crash Newssaam tv

Brazil Plane Crash :

ब्राझीलमध्ये विमान क्रॅश होऊन 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्सचा समावेश असल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यूमुखी 12 प्रवाशी अमेरिकन पर्यटक असल्याची माहिती समोर येत आहे.

सर्वजण ब्राझीलच्या अॅमेझोनच्या बार्सेलोस येथे जात होते, अशीही माहिती मिळत आहे. सध्या अपघातस्थळावरून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Brazil Plane Crash News
Mumbai-Goa Higway Accident : कोकणात जाणाऱ्या एसटी बसला अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू १९ जण जखमी

ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा अपघात झाला. दुर्घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता, तसेच खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Brazil Plane Crash News
Maharashtra Rain Update : ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर ८ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट, राज्यभरात कशी असेल स्थिती?

गव्हर्नर विल्सन लिमा यांनी सांगितले की, हे विमान मॅनौस एरोटॅक्सी एअरलाइनचे होते. कंपनीने देखील अपघाताला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप याप्रकरणी फारशी माहिती मिळालेली नाही, असं कंपनीने म्हटलं आहे.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, विमान खराब हवामानामुळे कोसळले असावे. लँडिंगच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता. विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना कमी दृष्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com