BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं

BJP Woman Leader Dies After Accidental Gunshot: भाजपच्या महिला नेत्याचा भांडणादरम्यान गोळी लागून मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं
BJP Leader DeathSaam Tv
Published On
  • जबलपूरमध्ये भाजप नेत्या संगीता रजक यांचा गोळी लागून मृत्यू

  • घराबाहेर सुरू असलेल्या वादानंतर घडली घटना

  • पिस्तुलातून गोळी सुटून ती त्यांच्या पोटात लागली

  • या घटनेत गंभीर जखमी झालेल्या भाजप नेत्याचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भाजपच्या महिल्या नेत्याचा गोळी लागून मृत्यू झाला. जबलपूर जिल्ह्यातील रांझी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू शोभापूर येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. भांडणादरम्यान स्वत:च्या पिस्तुलमधून गोळी सोटून भाजप नेत्याला लागली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या भाजप नेत्याचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. संगीता रजक असे मृत्यू झालेल्या भाजपच्या महिला नेत्याचे नाव होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमध्ये शनिवारी मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान ही घटना घडली. घराबाहेर वाद आणि गोंधळ ऐकून पिस्तूल घेऊन भाजपच्या महिला नेत्या संगीता रजक घराबाहेर पडल्या. या भांडणादरम्यान संगीता यांच्या पिस्तुलमधून गोळी सुटली आणि ती त्यांना लागली. गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत तात्काळ हैदराबाद ओमेगा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारादरम्यान संगीता रजक यांचा मृत्यू झाला.

BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं
BJP Leader Death: भाजपच्या दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू, राजकीय वर्तुळात खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि जवानांनी रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा तयार करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या दुःखद आणि वेदनादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. या घटनेवेळी नेमकं काय घडलं याचा तपास पोलिस करत आहेत.

BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं
BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

शनिवारी रात्री उशिरा काही जण संगीता यांच्या घराबाहेर शिवीगाळ करत होते. त्यांचा आवाज ऐकून त्या पती बंटी रजक यांच्यासोबत बाहेर गेल्या. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना खडसावले आणि वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. याचदरम्यान भाजप नेत्या संगीता रागाने घरात गेल्या आणि त्यांनी पती बंटी रजक यांच्यासोबत परवाना असलेले पिस्तूल घेऊन बाहेर आल्या. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत पिस्तुलाचे ट्रिगर दाबले गेले आणि गोळी संगीता यांच्या पोटात लागली ज्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं
Karnataka Vidhan Sabha Election Results: कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारलं; बेळगावात कोणी मारली बाजी?

संगीता यांनी मागच्या पालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर नगरसेविका पदाची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता. त्या यावेळीही निवडणूक लढवण्याची तयारी करत होत्या. संगीता यांचे पती बंटी रजक हे देखील माजी आमदार आहेत. त्यांनी वीर सावरकर मंडळाचे उपाध्यक्ष आणि बूथ अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी संगीता यांच्या घराबाहेर बॉम्ब फेकले होते आणि गाड्यांची तोडफोड केली होती.

BJP Leader Death: भाजपच्या महिला नेत्याचा गोळी लागून मृत्यू, घराबाहेर सुरू असलेल्या भांडणादरम्यान भयंकर घडलं
BJP ला आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीआधी बडा नेता सोडणार पक्षाची साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com