राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभेत भाजपचा जोरदार विजय झाला. भाजपने तब्बल २१ खासदारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील १२ खासदारांनी विजय मिळवला तर ९ जणांचा पराभव झाला आहे. विधानसभेत विजयी झालेल्या १० खासदारांनी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय.(Latest News)
जे खासदार विधानसभेच्या निवडणुकीत जिंकलेत त्यांनी आज पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर या खासदारांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्यां खासदारांमध्ये खासदार किरोरी लाल मीना, राज्यवर्धन सिंह राठोड, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप, रीती पाठक, अरुण साओ, गोमती साई, दिया कुमारी आणि किरोनी लाल मीना यांनी आपला राजीनामा आज लोकसभा अध्यक्षांकडे दिला.
तर बाबा बालक नाथ आणि रेणुका सिंह यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये. हे दोन्ही खासदार लवकरच आपला राजीनामा देणार आहे. दरम्यान खासदारांना राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत उतरवल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती यांची भेट घेत या खासदारांनी आपला राजीनामा दिला.
मी लवकरच मंत्रिमंडळातील मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथील विधानसभा निवडणुकीत जिंकलेले केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रल्हाद सिंह पटेल म्हणालेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा बालक नाथ सिंह आणि रेणुका सिंह यांचा राजीनामा घेतला जाणार नसून पक्षश्रेष्ठी त्यांना राज्यसभेत कायम ठेवू इच्छित आहे. या दोन्ही खासदारांची नावे राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.