भाजप आमदाराला 1000 गोळ्या मारण्याची धमकी; राजकारणात खळबळ

BJP MLA Prem Narayan Pandey Death Threat Case In Gonda: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात भाजप आमदार प्रेम नारायण पांडे यांना 1000 गोळ्या मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
BJP MLA Prem Narayan Pandey receives serious death threat in Uttar Pradesh’s Gonda district
BJP MLA Prem Narayan Pandey receives serious death threat in Uttar Pradesh’s Gonda districtsaam tv
Published On

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील तरबगंज मतदारसंघाचे भाजप आमदार प्रेम नारायण पांडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीत त्यांना एक हजार गोळ्या मारून ठार करू अशी स्पष्ट धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आमदारांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका नामांकित आरोपीसह 8 ते 10 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. आमदाराच्या मुलाने आरोप केला आहे की त्यांच्या वडिलांची रेकी केली जात असून त्यांना ठार मारण्यासाठी कट रचला जात आहे. या सर्वबाबत आमदार प्रेम नारायण पांडे यांचे सुपुत्र विनोद कुमार पांडे यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

BJP MLA Prem Narayan Pandey receives serious death threat in Uttar Pradesh’s Gonda district
Dolphin cyclone : 216 किमी वेग, २ देशांत इमर्जन्सी- हायअलर्ट, डॉल्फिन चक्रीवादळ किती भयावह? भारतावर काय परिणाम होणार? वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल सिंह यांनी आमदारांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुनिल सिंह यांचे धाडस इतके वाढले की त्यांनी आमदारांना एक हजार गोळ्या मारण्याची धमकी दिली. तसेच सुनिल सिंह टोळी तयार करून आमदारांची रेकी करत आहे. विनोद पांडेय यांनी आरोप केला आहे की त्यांच्या वडिलांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यात 8 ते 10 जणांचा सहभाग आहे. धमकीचा ऑडिओ त्यांनी पेनड्राइव्हमध्ये सेव्ह करून पोलिसांना दिला आहे. त्यांनी या घटनेला कुटुंबाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.

BJP MLA Prem Narayan Pandey receives serious death threat in Uttar Pradesh’s Gonda district
मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! CMच्या बैठकीला ३७ खासदारांची दांडी, काय आहे कारण?

दरम्यान, तरबगंज पोलिसांनी सांगितले की तक्रारीच्या आधारे विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. तपासात जे काही पुरावे समोर येतील त्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, आमदारांच्या समर्थकांनी या प्रकरणात कठोर कारवाईसह त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.

BJP MLA Prem Narayan Pandey receives serious death threat in Uttar Pradesh’s Gonda district
तुमचं मूल फेसबुक, इन्स्टा वापरतंय? सरकार आणतेय नवा कायदा; पालकांची परवानगी नसेल तर...

कोण आहेत प्रेम नारायण पांडे?

गोंडा जिल्ह्यातील तरबगंज मतदारसंघातून भाजपा आमदार प्रेम नारायण पांडे यांनी 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुमारे 38 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार रामभजन चौबे यांचा पराभव केला होता. हा मतदारसंघ पूर्वी ‘डिक्सिर’ या नावाने ओळखला जात होता आणि तो राखीव होता. 2012 मध्ये या मतदारसंघाचे नाव बदलून ‘तरबगंज’ करण्यात आले आणि तो सर्वसाधारण झाला. 2017 मध्येही या मतदारसंघातून प्रेम नारायण पांडे विजयी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com