Shahnawaz Hussain: भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल

Shahnawaz Hussain: भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आलाय.
Shahnawaz Hussain
Shahnawaz Hussainsaam Tv
Published On

माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Latest Politics News)

दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी हुसेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सय्यद शाहनवाझ हुसेन यांचे वय ५४ आहे. हुसेन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये आणि भाजप आणि JD(U) युतीच्या काळात बिहार सरकारमध्ये विविध महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. हुसेन हे मूळचे बिहारचे असून ते यापूर्वी किशनगंज आणि भागलपूर लोकसभा मतदारसंघात खासदार राहिलेत. सध्या ते बिहार विधान परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

Shahnawaz Hussain
Dhangar Reservation: धनगर समाजाच्या ५ मागण्या शिंदे सरकारकडून मान्य; काय होत्या 'या' मागण्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com