भाजपचे नेते तथा नगरसेवक कुल्लू कुशवाह यांची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने मध्यप्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि मृत्यू होईपर्यंत धाडधाड गोळ्या झाडल्या. घटनेनंतर सुमारे अर्धा तास त्यांचा मृतदेह रस्त्यावर पडून होता. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यांनुसार, कल्लू कुशवाह दररोज सकाळी फिरायला जातात. नेहमीप्रमाणे आज ही फिरायला बाहेर पडले. अचानक काही अनोळखी त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला आणि यामध्ये कुशवाह यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमल्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. माहिती मिळताच दातिया जिल्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात भाजप नगरसेवकाच्या हत्येमागे वैयक्तिक वैर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत भाजप नेते आणि नगरसेवक कल्लू कुशवाहा यांच्यावर यापूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल होता आणि त्यासाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र चार महिन्यांपूर्वी कल्लू कुशवाहा यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली. पोलिसांनी आता नगरसेवकाच्या मागील वाद आणि आज घडलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.