Political News : लोकसभा निवडणुकांबाबत ममता बॅनर्जींनंतर नितीश कुमार यांचा मोठा दावा

Nitish Kumar big Statement : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांबाबत मोठा दावा केला आहे.
Nitish Kumar On Loksabha Elections
Nitish Kumar On Loksabha Elections SAAM TV
Published On

Loksabha Elections 2024 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांबाबत मोठा दावा केला आहे. केंद्रातील भाजप सरकार सात ते आठ महिन्यांआधीच लोकसभेच्या निवडणुका घेईल, असं ते म्हणाले. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकजुटीने राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुका लवकर घेतल्या जाऊ शकतात, असं विधान यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. भाजपवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. डिसेंबर किंवा जानेवारीतच सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

भाजपने २०२४ च्या निवडणुका जाहीर होण्याआधीच देशातील सर्व हेलिकॉप्टर बुक केल्याचा दावाही ममता यांनी केला होता.

Nitish Kumar On Loksabha Elections
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी? राज्याचा दर्जा पुन्हा कधी?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली सविस्तर माहिती

नितीश कुमार यांचा संयोजकपदास नकार

तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचं संयोजकपद घेण्यास नकार दिला होता. मला विरोधी पक्षांच्या आघाडीचे संयोजकपद नको. त्या पदावर दुसरी कुणीतरी व्यक्ती असेल. सर्वांना एकत्र आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे ते म्हणाले होते. त्यानंतर इंडिया आघाडीचा संयोजक काँग्रेसमधून असला पाहिजे, असं संयुक्त जनता दलाकडून सांगण्यात आले होते. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव सूचवले होते.

Nitish Kumar On Loksabha Elections
Fodder Scam News: चारा घोटाळा प्रकरणात ३५ जणांची निर्दोष सुटका, इतर आरोपींना कोर्टाने काय दिली शिक्षा?

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक

इंडिया आघाडीची पुढची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. बेंगळुरूच्या बैठकीनंतर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मुंबईतील बैठकीत पुढील रणनीती निश्चित करणार आहेत. दोन बैठकानंतर मुंबईत होणारी बैठक महत्वाची मानली जाते. संयोजक आणि जागावाटप यांसारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते.

मुंबईतील बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण

संयोजक किंवा समन्वयकाची निवड होणार

समन्वयक समितीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

दिल्लीत मुख्यालयासंदर्भात चर्चा

आघाडीत एकमत राहावे यासाठी इंडियाच्या प्रवक्त्यांशी संबंधित चर्चा

भविष्यात सामूहिक रॅली आणि जनतेशी संबंधित मुद्द्यांवरील आंदोलनाची दिशा

आणखी पक्षांना सोबत घेण्याबाबत चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीची दिशा काय असेल?

जागावाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com