Biparjoy Cyclone Live Status : बिपरजॉय चक्रीवादळ सध्या नेमकं कुठे? किनारपट्टीवर कधी धडकणार? वाऱ्यांचा वेग किती असेल?

Cyclone Biporjoy News : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व बचाव दलांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Biparjoy Cyclone Update
Biparjoy Cyclone UpdateSaam Tv
Published On: 

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू गुजरात आणि कराचीच्या समुद्रकिनारी सरकत आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून बिपरजॉक चक्रीवादळ सध्या जवळपास 200 किमी अंतरावर आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व बचाव दलांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ कच्छ जिल्ह्याच्या जखाऊ बंदरावर धडकणार आहे. ज्यावेळी चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकेल त्यावेळी वाऱ्याचा वेग 150 प्रति तास किमी असेल.

सध्या चक्रीवादळ कुठे?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ दुपारी 2.30 वाजेच्या सुमारासअरबी समुद्राच्या जाखाऊ बंदरवर धडकेल. 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ जखाऊ बंदराजवळील मांडवी आणि कराची दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानच्या किनारपट्टीला पार करेल, असा अंदाज आहे. (Latest Marathi News)

Biparjoy Cyclone Update
Monsoon Rain Update: बिपरजॉय चक्रावादळाने टेन्शन वाढवलं; मान्सूनच्या सरी कधी बरसणार? हवामान खात्याकडून नवी अपडेट

हजारो नागरिकांचा स्थलांतर

चक्रीवादळामुळे कच्छसह गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसासाठी आज रेड अलर्ट  (Rain Alert)  जारी करण्यात आला आहे. 74 हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. लष्कर, नौदल, एअरफोर्स व्यतिरिक्त NDRF च्या 18 टीम तैनात आहेत.

Biparjoy Cyclone Update
Gujarat Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला, गुजरातमधील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट

अनेक रेल्वे रद्द

चक्रीवादळामुळे गुजरातला जाणाऱ्या आणि जाणाऱ्या 100 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजकोट विमानतळावर विमानांची उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.