AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Bill Gates Ai Misuse 1 Billion Deaths Warning: AI मुळे 100 कोटी लोकांचा मृत्यू होणार असल्याचा खळबळजनक दावा ज्येष्ठ उद्योगपती बिल गेट्स यांनी केलाय...मात्र बिल गेट्स यांनी हा दावा का केलाय? AI मानवासाठी कसं घातक आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...
Bill Gates AI misuse 1 billion deaths warning
Bill Gates AI misuse 1 billion deaths warningsaam tv
Published On: 

तंत्रज्ञानाच्या जगात दररोज नवनवे प्रयोग होत असताना, आता एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच मानवाच्या अस्तित्वासाठीच सर्वात मोठा धोका ठरू लागलाय का?.. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी दिलेल्या एका इशाऱ्याने संपूर्ण जगात खळबळ उडालीय...एआयच्या चुकीच्या वापरामुळे जगात तब्बल 100 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा बिल गेट्स यांनी दिलाय...या इशाऱ्यावरून जगभरात खळबळ उडाली असतानाच ऑस्टेलियात घडलेली घटना याचच उदाहरण आहे,

एका एआय मॉडेलनं थेट ऑस्ट्रेलियाचं सरकारी आरोग्य पोर्टल हॅक केलंय... ओपनएआय च्या या मॉडेलने ऑस्ट्रेलियन आरोग्य डेटा प्रणालीमध्ये बेकायदेशीर घुसखोरी करून आरोग्य खर्च आणि औषध अनुदानाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती आणि फाईल्स मिळवल्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हॅकिंग घडल्यानंतर तब्बल 54 दिवसांनी ओपनएआयने ऑस्ट्रेलियन सरकारला या घटनेची माहिती दिली.

या गंभीर प्रकारानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांच्याकडे आपला संताप व्यक्त केला..त्यानंतर ओपन एआयनं काय स्पष्टीकरण दिलं...ओपनएआयनंही मान्य केलं की, त्यांच्या एआय मॉडेलने अशा काही कृती केल्या ज्या स्वतः कंपनीलाही अपेक्षित नव्हत्या. एआयवर आताच नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा मानवाने या तंत्रज्ञानावरील नियंत्रण गमावल्यास त्याचे परिणाम अत्यंत विनाशकारी असतील, अशी कबुलीही ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी दिलीय... एआयच्या या कारनाम्यामुळे हे तंत्रज्ञान आता नियंत्रणाबाहेर जाऊ शकत असल्याचं स्पष्ट झालाय.... त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन एआयच्या वापरासंदर्भात कठोर मानकं आणि कायदे बनवण्याची गरज अधोरेखित होऊ लागलीय... अन्यथा मानवनिर्मित AI तंत्रज्ञानाच मानवाच्या विनाशाचं कारण ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com