Video : काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना; नेत्यांसह अचानक कोसळला स्टेज

Congress News : या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये अनेक काँग्रेस नेते स्टेजवर असल्याचं दिसतं आहे.
Bilaspur News
Bilaspur NewsSaam Tv
Published On: 

Bilaspur News : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात रविवारी निदर्शनांदरम्यान स्टेज कोसळून काँग्रेसचे दोन आमदार आणि काही नेते जखमी झाले. येथील देवकीनंदन चौकात झालेल्या या घटनेत काँग्रेसचे छत्तीसगड युनिटचे प्रमुख मोहन मरकाम हे थोडक्यात बचावले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या विरोधात पक्षाने येथे मशाल रॅलीचे आयोजन केले होते. (Latest Marathi News)

Bilaspur News
Buldhana Crime News: लग्न होत नसल्याच्या निराशेतून मुलाचं जन्मदात्या पित्यासोबत भयंकर कृत्य; मन सुन्न करणारी घटना

या घटनेचा एक व्हिडिओही (Video Viral) समोर आला आहे. यामध्ये अनेक काँग्रेस (Congress) नेते स्टेजवर असल्याचं दिसतं. यावेळी ते मोठमोठ्याने घोषणाही देत आहेत. स्टेजवर भरपूर गर्दी झालेली आहे. इतक्यात नेत्यांनी भरलेला स्टेज अचानक कोसळला आणि नेते खाली कोसळल्याचं पाहायला मिळालं. या घटनेत आमदार शैलेश पांडे आणि रश्मी सिंह आणि पक्षाच्या इतर काही नेत्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

स्टेज कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. तिथे उपस्थित लोक ओरडू लागल्याचंही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली आंही. मात्र या घटनेत काही नेते जखमी झाले आहेत.

देशभरात अनेक राज्यांमध्ये काँग्रेसकडून लोकशाही वाचवा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. बिलासपूरमध्येही ही रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅलीनंतर नेते लोकांना संबोधित करत असतानाच ही घटना घडली. स्टेज कोसळताच ही सगळे धाडकन खाली पडले. घटनेची माहिती मिळताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक उपचार केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.