Bihar Ministers portfolios: बिहारमध्ये 'नो महाराष्ट्र पॅटर्न'! खातेवाटपात उलटफेर; CM नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय

Bihar Ministers Portfolios Distribution : बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता आल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गुरुवारीच झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितीश कुमार यांनी खातेवाटप जाहीर केलं. नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच त्यांनी गृहमंत्रिपद सोडलंय.
Bihar CM nitish Kumar
Bihar CM nitish Kumarsaam tv
Published On
Summary
  • बिहार मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर

  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृहमंत्रिपद सोडलं

  • उपमुख्यमंत्र्यांकडं सोपवला गृहविभागाचा कारभार

पाटणा : बिहारमधील एनडीएच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी खातेवाटप जाहीर केलं. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच गृहमंत्रिपद सोडलं आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडं गृहमंत्रिपद सोपवलं आहे. त्यामुळं चौधरींचं नव्या सरकारमधील वजन आणखी वाढलंय. दरम्यान, खातेवाटपात 'महाराष्ट्र पॅटर्न' दिसून आला नाही. महाराष्ट्रात गृहमंत्रिपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं नगरविकास, तर उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृह मंत्रालय स्वतःकडं ठेवलं नाही. यापूर्वी गृह विभाग नितीश कुमार यांच्याकडंच होता. मुख्यमंत्री असताना गृह मंत्रालय पहिल्यांदाच त्यांच्याकडे नसेल. 'महागठबंधन' सरकारच्या काळातही त्यांनी गृहविभाग स्वतःकडं ठेवला होता. तसंच एनडीए सरकारच्या काळातही त्यांच्याकडेच हे मंत्रालय होतं.

दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनाही 'वजनदार' खातं

बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनाही वजनदार खातं मिळालं आहे. त्यांच्याकडं भूमी आणि महसूल विभाग आणि खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाची जबाबदारी सोपवली आहे. तर मंगल पांडेंकडं पुन्हा आरोग्य मंत्रालय देण्यात आलं आहे. मागील सरकारच्या काळातही त्यांच्याकडे आरोग्य खातं होतं. पांडे हे कायदा मंत्री देखील असणार आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांना उद्योग खातं देण्यात आलं आहे.

Bihar CM nitish Kumar
Bihar Government Formation: बिहारमध्ये पुन्हा 'नितीश सरकार', नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

बिहारचा अर्थमंत्री कोण?

संयुक्त जनता दल अर्थात जेडीयूचे वरिष्ठ नेते बिजेंद्र प्रसाद यादव हे बिहारचे नवे अर्थमंत्री असतील. त्यांच्याकडे ऊर्जा विभागाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालय यापूर्वी भाजपकडे होतं. यावेळी मात्र जेडीयूच्या वाट्याला आलं आहे. विजय कुमार चौधरींकडं जलसंसाधन आणि संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी असेल. लेशी सिंह यांच्याकडे अन्न आणि ग्राहक मंत्रालयाचा कारभार सोपवला आहे.

Bihar CM nitish Kumar
Bihar Cabinet Ministers List: नितीश कुमार यांच्यासोबत २६ मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा संपूर्ण लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com