Bihar Crime News: सासूला जावई पसंतच पडला नाही; पेट्रोल ओतून दिलं पेटवून

Bihar Crime News: या तरुणाच्या सासूला आपल्या मुलीने निवडलेला मुलगा पसंत नव्हता.
Nandurbar Crime News
Nandurbar Crime NewsSaam tv
Published On: 

Bihar News: प्रत्येक घरात जावयाला एक वेगळा मान असतो. सासू-सासरे आपल्या जावयाला मुलाप्रमाणे प्रेम आणि इज्जत देतात. अनेक ठिकाणी तर जावई घरी आल्यावर एखादा सन असल्याप्रमाणे जल्लोष साजरा केला जातो. अशात बिहारच्या पटना येथून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. (Latest Crime News)

या घटनेत एका सासूने आपल्या जावयाची बेकार हालत केली आहे. मुलीने प्रेमविवाह केला. मात्र आईला जावाई (Son In Law) पसंत नसल्याने तिला याचा फार राग आला. संतप्त सासूबाईने (Mother In Law) आपल्या जावयावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये सासूने जावयावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत पेटवून दिलंय.

Nandurbar Crime News
Solapur Crime News : हनुमान मंदिरात गांजा ओढण्यास विरोध, महंतावर हल्ला; सोलापूरातील साधू, महंत आक्रमक

या घटनेत जावई प्रचंड भाजला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्यावर उपचार करत आहेत. या तरुणाच्या सासूला आपल्या मुलीने निवडलेला मुलगा पसंत नव्हता. ती त्याचा फार द्वेश करत होती. त्यामुळे अखेर तिने आपल्या जावयावर राग काढत त्याला पेटवून दिले आहे.

विकास कुमार असं जखमी तरुणाचं नाव आहे. तो मजूरीचं काम करुन आपला उदर्नीवाह करतो. मुलगा काळा आणि मुलगी गोरी ही गोष्ट काही मुलीच्या आईला पसंत नव्हती. त्यामुळे तिने हे पाउल उचललं.

Nandurbar Crime News
Hingoli Crime News : भेटायला ये नाहीतर तुझ्या वडिलांना संपवतो, एकतर्फी प्रेमातून तरूणानं दिलेल्या धमकीनंतर अल्पवयीन मुलीने...

जखमी जावयाने सांगितलं की, त्याची पत्नी काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. तिला परत घरी घेऊन येण्यासाठी मी तेथे गेलो होतो. त्यावेळी अचानक माझ्या सासूने माझ्यावर पेट्रोल ओतून मला जाळलं. या दुर्घटनेत जावई ७५ टक्के भाजला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.