Bihar Love Affair : सोशल मीडियावर फ्रेंडशिप, प्रेम आणि चॅटिंग; मुलीला भेटायला गेला आणि गायबच झाला

Bihar Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये गप्पा रंगत होत्या. सेटिंग आणि चॅटिंगच्या एपिसोडनंतर गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला प्रेमवीरच आता गायब झाला आहे.
Love Affair, crime news in marathi
Love Affair, crime news in marathiSAAM TV
Published On: 

Bihar Crime News : बिहारमध्ये 'अजब प्रेम की गजब कहानी'चे नवनवे एपिसोडच सुरू आहेत, असे चित्र आहे. अलीकडेच एक मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तिचं प्रेमही संपलं. दोघांचं ब्रेकअप झालं. ही घटना ताजी असतानाच बिहारमध्येच असा प्रेमाचा 'लोच्या' समोर आला आहे.

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये गप्पा रंगत होत्या. सेटिंग आणि चॅटिंगच्या एपिसोडनंतर गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला प्रेमवीरच आता गायब झाला आहे. या तरुणाला मुलीनंच भेटायला बोलावलं होतं. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. धक्कादायक म्हणजे त्या तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या फोनवरूनच ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला आहे. त्यामुळे सगळेच हादरून गेले आहेत.

Love Affair, crime news in marathi
Ahmednagar Crime News: मुली ओरडत होत्या अन्.. भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रुपाली चाकणकरांनी शेअर केला व्हिडिओ

तरुणाच्या फोनवरून ५० लाखांची खंडणी मागितल्यानंतर तो फोनही बंद येत आहे. बिहारमध्ये गया येथे राहणाऱ्या १८ वर्षीय मुलाची सोशल मीडियावर एका मुलीशी ओळख झाली. त्यांच्यात बोलणं सुरू झालं. शुक्रवारी मुलगा त्या मुलीला भेटायला पाटणा येथे गेला. पण तो परत आलाच नाही. या मुलाचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News In Marathi)

अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. मुलाचा फोन बंद येत असल्याने घरच्यांनी बेलागंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेची त्वरीत दखल घेत वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी बेलागंज येथे जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. रिषभ (वय १८) असं कथितरित्या अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरचा तो नातू आहे. रिषभचे अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली आहे.

Love Affair, crime news in marathi
Bribe Trap : सातबारा उताऱ्यासाठी ३ हजाराची लाच; तलाठी एसीबीच्‍या ताब्‍यात

नक्की काय घडलं?

रिषभची सोशल मीडियावर एका मुलीशी ओळख झाली. त्यांच्यात फोनवरून चॅटिंग सुरू झाली. प्रेमसंबंध जुळले. तो मुलीला भेटायला थेट पाटण्याला पोहोचला. घरी यायाला उशीर होईल असे सांगून तो दुचाकीवरून निघाला. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. त्याचा फोन हा संपतचकपर्यंत सुरू होता. त्यानंतर फोन बंद झाला. त्यामुळे घरच्यांना काळजी वाटली. त्यांनी पोलीस ठाणे गाठलं. रिषभची संपतचक येथे मुलीशी भेट झाली. दोघेही दुचाकीवरुन निघून गेले, असं रिषभच्या मित्रांनी सांगितलं.

शनिवारी रात्री रिषभच्या घरच्यांना एक फोन आला. फोनवरुन मुलगा सुखरुप हवा असेल तर ५० लाख रुपये द्या अशी मागणी करण्यात आली. पण पैसे कुठे आणून द्यायचे हे विचारेपर्यंत फोन कट झाला. तेव्हा घरच्यांनी बेलागंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. रिषभला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना केले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने रिषभचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.