CM Nitish Kumar Bihar Cabinet Expansion News Update | पाटणा: महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता बिहारमधील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बिहारच्या कॅबिनेट विस्तारासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माहिती दिली आहे.
नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या माहितीनुसार, बिहारच्या कॅबिनेटचा (Bihar Cabinet) विस्तार १५ ऑगस्टनंतर म्हणजेच स्वातंत्र्यदिनानंतर होणार आहे. बिहार राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १६ ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे.
बिहारमधील दोन दिवसांच्या राजकीय (Politics) उलथापालथीनंतर बुधवारी महाआघाडीचं सरकार स्थापन झालं. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची, तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Bihar CM)
अशात आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या कॅबिनेटचा विस्तार कधी होणार आणि त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी फायनल झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बिहार सरकारमध्ये १६ ते १८ मंत्री राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) असू शकतात. तर काँग्रेसला (Congress) तीन ते चार मंत्रिपदे मिळू शकतील. तर जीतनराम मांझी यांच्या पक्षाला मागील सरकारप्रमाणेच या नव्या सरकारमध्येही एक मंत्रिपद मिळेल. तर अपक्षांनाही संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.
आरजेडीकडून मंत्रिपदासाठी संभाव्य नावे
आरजेडीकडून तेजप्रताप यादव, कुमार सर्वजीत, अख्तरुल इस्लाम शाहीन, अवध बिहारी चौधरी, ललित यादव, आलोक कुमार मेहता, अनिता देवी, जितेंद्र कुमार राय, अनिल सहनी, चंद्रशेखर, भाई विरेंद्र, भारत भूषण मंडल, शाहनवाज, समीर महासेठ, वीणा सिंह, रणविजय साहू, सुरेंद्र राम, सुनील सिंह आणि केदार सिंह यांच्यापैकी एक, बच्चा पांडेय आणि राहुल तिवारी यांच्यामधून कुणी एक, कार्तिक सिंह आणि सौरभ कुमार यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळू शकतं.
जेडीयूच्या कोट्यातून यांना मिळू शकतं मंत्रिपद
संयुक्त जनता दलाच्या कोट्यातून बिजेंद्र प्रसाद यादव, विजय कुमार चौधरी, उपेंद्र कुशवाहा, संजय झा, लेसी सिंह, सुनील कुमार, जयंत राज, जमा खान, अशोक चौधरी यांना मंत्रिपदे मिळू शकतात.
काँग्रेसच्या कोट्यातून मदन मोहन झा, अजित शर्मा, शकील अहमद खान आणि राजेश कुमार राम यांना मंत्रिपद मिळू शकतं. तर जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या कोट्यातून संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.