मोठी बातमी! नितीश कुमार यांचा राजीनामा; बिहारमधील भाजपचं सरकार कोसळलं

नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला
Nitish Kumar
Nitish KumarSaam TV

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अगदी काहीच वेळापूर्वी त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. नितीश कुमार यांनी राजीनामा देताच बिहारमधील भाजप (BJP) सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीएपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर त्यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. (Bihar Latest Marathi News)

Nitish Kumar
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया; TET घोटाळ्याबद्दल म्हणाले...

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच नितीश कुमार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रही राज्यपालांना सुपूर्द केले. याआधी मंगळवारी महाआघाडीच्या बैठकीत नितीश कुमार यांना पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएपासून वेगळे होतील, अशी अटकळ बांधली जात होती.

मागील काही दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. त्यानंतर राज्यपालांकडे आपला राजीनामाही सुपूर्त केला.

Nitish Kumar
Maharastra Politics : मंत्रिपदावरून शिंदे गटातील आमदार नाराज; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं?

नितीश कुमार यांनी आज आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. नितीश कुमार राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी पोहोचले. नितीश कुमार कधीही राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात, असे बोलले जात होते.

त्यासाठी त्यांनी राज्यपालांकडे वेळही मागितली होती. अखेरीस राज्यपालांनी त्यांना दुपारी चार वाजता भेटण्याची वेळ दिली. राजीनामा देण्यासाठी नितीशकुमार एकटेच राजभवनात पोहोचले. त्यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शिंदे गटासोबस भाजपने सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपची साथ सोडली. हा भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com