सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Bihar Government School Headmaster Arrested Under POCSO Act: बिहारमधील बांका जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून सरकारी शाळेच्या 45 वर्षीय मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली.
BIHAR GOVERNMENT SCHOOL HEADMASTER ARRESTED UNDER POCSO ACT
BIHAR GOVERNMENT SCHOOL HEADMASTER ARRESTED UNDER POCSO ACTsaam tv
Published On: 

बिहारमधील बांका जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारीच 45 वर्षीय मुख्याध्यापक विकास कुमार यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या महितीनुसार, इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईने गुरुवारी संध्याकाळी पोलिस ठाण्यात जाऊन मुख्याध्यापक विकास कुमार यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

BIHAR GOVERNMENT SCHOOL HEADMASTER ARRESTED UNDER POCSO ACT
Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीला शाळेतील नोंदणीचे काम पूर्ण करण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावले होते. त्यानंतर विद्यार्थिनी मुख्याध्यापकांच्या कक्षातून बाहेर पडत असताना त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

BIHAR GOVERNMENT SCHOOL HEADMASTER ARRESTED UNDER POCSO ACT
मुंबईत‘स्पेशल २६’ चित्रपटासारखा थरार! आयकर अधिकारी बनून कोट्यवधींची खंडणी, ६ जणांच्या टोळीचा पर्दाफाश

विद्यार्थिनीच्या आईने तक्रारीत आरोप केला आहे की, मुख्याध्यापकांनी चुकीच्या हेतूने मुलीला मागून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनीने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घरी परतली. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

BIHAR GOVERNMENT SCHOOL HEADMASTER ARRESTED UNDER POCSO ACT
पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

पोलीस अधिकारी चंदन कुमार यांनी मुख्याध्यापक विकास कुमार यांना विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर अटक केल्याची पुष्टी केली. या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com