Political News : मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधीच माजी मंत्र्याने पक्षाची साथ सोडली

Bihar Political News : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसलाय. माजी मंत्र्याने पक्षाची साथ सोडली आहे.
Bihar News
Bihar Political NewsSaam tv
Published On
Summary

जेडीयूचे माजी मंत्री लक्ष्मेश्वर राय यांचा पक्षाचा राजीनामा

जेडीयूवर मागासवर्गीयांना दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप

संजय झा यांच्या पक्षावरील वर्चस्वामुळे पक्षात काम करणे अशक्य असल्याची टीका

लक्ष्मेश्वर राय लवकरच आरजेडीमध्ये प्रवेश करणार

bihar Election : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. नितीश कुमार यांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. मात्र, त्यांनाच आज मोठा धक्का बसला आहे. जेडीयूचे माजी मंत्री लक्ष्मेश्वर राय यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री लक्ष्मेश्वर राय लवकरच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

पक्ष सोडल्यानंतर लक्ष्मेश्वर यांनी जेडीयूच्या विरोधात बोलणे सुरु केले आहे. मी पक्षात अनेक वर्ष काम केलं. परंतु जेडीयू पक्ष आता हा मागासवर्गीय समाजाचा राहिला नाही. मागासवर्गीय समाजाच्या लोकांना कोणताही सन्मान मिळत नाही. कारण जेडीयूमध्ये मागासवर्गीय लोकांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. यासाठी मी मोठं पाऊल उचललं आहे.

Bihar News
Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

लक्ष्मेश्वर यांनी टीका करताना पुढं म्हटलं की, संजय झा यांनी पक्षावर कब्जा केला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय पक्षात कोणतंही काम होत नाही. संजय झा हे पक्षाला संपवण्याचे काम करत आहे. त्यामुळे मी राष्ट्रीय जनता दलाला समर्थन दिलं आहे. मी आता तेजस्वी यादव यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करेल'.

Bihar News
Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

कोण आहेत लक्ष्मेश्वर राय?

माजी मंत्री लक्ष्मेश्वर राय हे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील लौकहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी २०१५ साली विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. लक्ष्मेश्वर यांनी भाजपचे उमेदवार प्रमोग प्रियदर्शी यांना पराभूत केलं होतं. त्यांनी विद्यार्थीदशेत असताना राजकारणाला सुरुवात केली. ते एसएफआयचे जिल्हा सचिव देखील राहिले आहेत. त्यांची पत्नी अंगणवाडी केंद्रात सेविका होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com