Ajit Pawar : अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; भाजपने गेम केला, विद्यमान आमदारच फोडला!

Ajit Pawar Group MLA Kamlesh Singh : विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार कमलेश सिंह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Ajit Pawar Group MLA Kamlesh Singh
Ajit Pawar Group MLA Kamlesh SinghSaam TV
Published On

शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांनी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देखील मिळवलं. मात्र, आता भाजपनेच अजित पवार गटाचे आमदार फोडण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात झारखंडमधून झाली आहे. झारखंडचे अजित पवार गटाचे एकमेव विद्यमान आमदार कमलेश सिंह यांना भाजपने आपल्या गळाला लावलं आहे.

Ajit Pawar Group MLA Kamlesh Singh
Uday Samant Mobile : उदय सामंत यांचा हरवलेला मोबाइल अजितदादांकडे सापडला; पाहा VIDEO

येत्या ३ ऑगस्ट रोजी कमलेश सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी एकमेव पक्ष सोडून जात असल्याने झारखंडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे. कमलेश सिंह हे हुसेनाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष आहेत.

आमदार कमलेश सिंह पलामूच्या हुसेनाबादचे विद्यमान आमदार असून पक्षाच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत. त्यांनी मंत्रिपद देखील भूषवलं आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही आगामी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी कमलेश सिंह यांनी घड्याळ सोडून कमळ हातात घेण्याची तयारी सुरु केली आहे.

कमलेश सिंह यांच्यासोबत त्यांचे पुत्र सूर्या सिंह देखील भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. दोघांनी भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झारखंडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. असं असताना सिंह पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सब का साथ, सब का विकासच्या या धोरणामुळे आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सूर्या सिंह यांनी सांगितलं आहे. भारतीय जनता पक्ष हा आदिवासी आणि बिगर आदिवासींच्या कल्याणाला प्राधान्य देतो. त्यांनी राजकारणात सगळ्याच घटकांना योग्य प्रतिनिधीत्व दिलेलं आहे,' असंही सूर्या सिंह माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.

Ajit Pawar Group MLA Kamlesh Singh
Ladki Bahin Yojana : अजितदादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावलं; 'लाडकी बहीण' कार्यक्रमावरुन काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com