Manohar Lal Dhakad : आधी ती उतरली नंतर तो, हायवेवरच खुल्लमखुला शारीरिक संबंध, कोण आहे मनोहरलाल धाकड? भाजपशी काय कनेक्शन?

Manohar Lal Dhakad Viral Video : दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भानपुराजवळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोहरलाल धाकड हा नेता त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रस्त्यावरच शारिरीक संबंध ठेवतो.
Manohar Lal Dhakad Viral Video
Manohar Lal Dhakad Viral VideoSaam Tv News
Published On

भोपाळ : मध्य प्रदेशच्या एका नेत्यानं दिल्ली-मुंबई हायवेवरच गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मनोहरलाल धाकड असं त्या नेत्याचं नाव असून तो भाजपशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु भाजपने लगेचच तो आपल्या पक्षाचा नेता नसल्याचं जाहीर केलं. मनोहरलाल धाकडची पत्नी ही मंदसोर जिल्हा पंचायतीची सदस्या आहे.

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भानपुराजवळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोहरलाल धाकड हा नेता त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रस्त्यावरच शारिरीक संबंध ठेवतो. असे एकूण दोन वेळा तो शारिरीक संबंध ठेवताना दिसतो. हा व्हिडीओ १३ मे रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय.

Manohar Lal Dhakad Viral Video
Rajendra Supekar : राजेंद्र हगवणेंचे मेहुणे IG सुपेकरांची ऑडिओ क्लिपच ऐकवली, अंजली दमानियांनी केला मोठा गौप्यस्फोट

मनोहरलाल धाकड हा मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील बनी गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी ही जिल्हा पंचायत सदस्या आहे. मंदसोर जिल्हा पंचायतीच्या वार्ड क्रमांक ८ मधून ती भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आली आहे. मनोहरलाल धाकड हा भाजपचा नेता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मनोहरलाल धाकड हा भाजपचा प्राथमिक सदस्य देखील नाही. पण ऑनलाईनच्या माध्यमातून त्याने भाजपचे सदस्यत्व घेतलंय का? याची माहिती नसल्याचं मंदसोरचे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलं.

मनोहरलाल धाकड हा धाकड युवा महासभेचा राष्ट्रीय मंत्री होता. त्यानंतर त्याला या पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा धाकड महासभेने केली आहे. मनोहरलाल धाकडचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मनोहरलाल धाकडचा या व्हिडीओसंदर्भात भानपुरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम २९६ २८५ ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Manohar Lal Dhakad Viral Video
Cab Rules Change : कॅब, टॅक्सीबाबतचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कॅन्सलेशन चार्जचा नवा नियम काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com