Bharat Bandh: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर

Bharat Bandh Update: केंद्र सरकारने कामगार आणि शेतकरीविरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप करत भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये देशातील प्रमुख १० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. या बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात झालाय वाचा सविस्तर...
Bharat Band: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर
bharat bandh Saam tv
Published On

मोदी सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशभरातील १० प्रमुख कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंदमध्ये जवळपास २५ कोटी कर्मचारी सहभागी होतील असा दावा केला जात आहे. भारत बंदमुळे बँका, पोस्ट, विमा, वाहतूक, उद्योग, कोळसा खाण आणि बांधकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रातील काम प्रभावित होऊ शकते. सरकारने कामगार संघटनांना आमची दारं चर्चेसाठी नेहमीच खुली असल्याचे सांगितले.

कर्मचारी संघटनांनी १७ कलमी मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, एनएमडीसी लिमिटेड, खनिज आणि पोलाद कंपन्यांच्या कर्मचारी संघटना, बँका आणि विमा कंपन्यांशी संबंधित संघटना, राज्य सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचारी संघटना या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांनीही संपाला पाठिंबा दिला आहे.

Bharat Band: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर
Farmers Bharat Bandh: शेतकऱ्यांचा भारत बंद! काय सुरू राहणार, काय बंद होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये कामगार रस्त्यावर उतरले असून आंदोन करत आहेत. जाळपोळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना अडवले आणि आग विझवली. पश्चिम बंगालमध्ये सगळीकडे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डाव्या पक्षांचे कार्यकर्ते प्चिम बंगालमधील जाधवपूर रेल्वे स्थानकाजवळ एकत्र आले आणि त्यांनी रेल्वे रूळावर आंदोलन केले. रेल्वे रूळावर बसून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली.

Bharat Band: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर
Bharat Bandh : मोठी बातमी! कोट्यवधी कामगारांकडून बुधवारी भारत बंदची हाक; शाळा, बँका, पोस्ट ऑफिस... काय बंद राहणार?

डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनांनी जाधवपूर परिसरात मोर्चा देखील काढला. यामध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झआले होते. पश्चिम बंगालमधील मिदनापूर सेंट्रल बस स्टँडवरून वाहनांची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या डाव्या कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, दिल्ली-एनसीआरमध्ये भारत बंदचा फारसा परिणाम झाला नाही. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर भारत बंदमुळे सिलिगुडीमधील सरकारी बस चालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून हेल्मेट घालत बस चावल्या. झारखंडमधील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशव्यापी भारत बंददरम्यान रांचीमधील सीएमपीडी मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.

Bharat Band: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर
Bharat Bandh Today : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद, कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

केरळमधील कोची येथील रस्त्यावर वर्दळ दिसत नाही. सर्व रस्ते रिकामे पाहायला मिळत आहे. भारत बंदच्या समर्थनार्थ केरळच्या कोट्टायममध्ये दुकाने आणि शॉपिंग मॉल बंद होते. त्यांनी केंद्र सरकारवर कॉर्पोरेट समर्थक धोरणे राबवत असल्याचा आरोप केला. भारत बंदचा परिणाम केरळच्या कोइम्बतूरमध्ये पाहायला मिळाला. केरळच्या दिशेने जाणाऱ्या बसेस आंदोलनकर्त्यांनी थांबल्या. उक्कडम बस स्टँड परिसरात शांतता दिसत आहे. तिरुप्पूर येथे कामगार संघटनेच्या संपापासून अप्रभावित राहिला नाही. जिल्ह्यात ५४० बसेस सामान्यपणे धावत आहेत.

Bharat Band: भारत बंदचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राज्यात, कुठे काय परिस्थिती? वाचा एका क्लिकवर
Bharat Bandh: भारत बंददरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com