Priya More
देशातील कामगार संघटनांनी आज म्हणजे ९ जुलै रोजी भारत बंदची हाक दिली आहे.
केंद्र सरकारने कामगार आणि शेतकरीविरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप करत हा बंद पुकारण्यात आला आहे.
या भारत बंदमध्ये १० प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. २५ कोटी कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
मोदी सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात हा बंद असणार आहे.
भारत बंददरम्यान आज बँकिंग सेवा, विमा कंपन्यांचे काम, पोस्ट ऑफिस, कोळसा खाणींचे काम बंद राहणार आहे.
भारत बंद दरम्यान सरकारी बसेस, महामार्ग आणि रस्ते बांधकाम, सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन बंद राहणार आहे.
भारत बंद दरम्यान खासगी कंपनी, रुग्णालये, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.
तर खासगी शाळा, महाविद्यालये आणि ऑनलाईन सेवा भारत बंद दरम्यान सुरू राहणार आहेत.