Bank Holidays June 2024: जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, एका क्लिकवर चेक करा पूर्ण लिस्ट

Bank Holiday June 2024 List: जून महिन्यामध्ये जर तुम्ही बँकेमध्ये काही कामासाठी जाण्याचा प्लान करत असाल तर बँकेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जरूर वाचा. जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही.
Bank Holidays June 2024: जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, एका क्लिकवर चेक करा पूर्ण लिस्ट
Bank Holidays June 2024Saam Tv

मे महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. मे महिना संपून उद्यापासून जून महिन्याला सुरूवात होणार आहे. जून महिन्यात तुम्हाला देखील बँकेशीसंबंधित काही महत्त्वाची कामं असतील. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी कोणत्या दिवशी बँक सुरू आहे आणि कोणत्या दिवशी बंद राहील हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे राहिल. अशामध्ये जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत (Bank Holiday 2024) महत्वाची अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) जून २०२४ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

जून महिन्यामध्ये जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही कामं असतील तर ते तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करा. कारण या महिन्यामध्ये १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या जून महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित काही कामं करायची असतील तर सुट्टयांची यादी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी आणि कोणत्या राज्यांमध्ये या महिन्यामध्ये बँका बंद राहतील हे सांगणार आहोत...

Bank Holidays June 2024: जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, एका क्लिकवर चेक करा पूर्ण लिस्ट
YES Bank: येस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर

बँकांच्या सुट्ट्यांची ही यादी आरबीआयने राष्ट्रीय स्तरावर जारी केली आहे. विविध राज्यांमध्ये येणाऱ्या अनेक सणांच्या व्यतिरिक्त शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही बँकेत जाण्याचा प्लान करत असाल तर ही यादी एकदा पाहून जाल जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. नाही तर बँकेत जाऊन तुमचे काम होणार नाही आणि तुमच्या वेळेसोबत तो दिवसही वाया जाईल.

Bank Holidays June 2024: जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, एका क्लिकवर चेक करा पूर्ण लिस्ट
Pune Porsche Accident Case : अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले, ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

जूनमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी -

1 जून 2024 - या दिवशी देशातील काही ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे बँका बंद राहतील.

2 जून 2024- रविवार असल्यामुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

8 जून 2024- महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

9 जून 2024 - रविवारमुळे बँका बंद राहतील

16 जून 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

22 जून 2024- महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

23 जून 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

30 जून 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

Bank Holidays June 2024: जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, एका क्लिकवर चेक करा पूर्ण लिस्ट
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल; रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

जूनमध्येही या दिवशी बँका राहणार बंद -

10 जून 2024 - श्री गुरु अर्जुन देव जी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त पंजाबमध्ये बँका बंद राहतील.

14 जून 2024 - ओडिशामध्ये या दिवशी पाहिली राजामुळे बँका बंद राहतील.

15 जून 2024 - मिझोराम या ईशान्येकडील राज्यामध्ये YMA दिवस आणि ओडिशातील राजा संक्रांतीमुळे बँका बंद राहतील.

17 जून 2024 - बकरी ईदनिमित्त काही राज्ये वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

21 जून 2024 - वटपौर्णिमानिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Bank Holidays June 2024: जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, एका क्लिकवर चेक करा पूर्ण लिस्ट
Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com