अनैतिक संबंधातून रक्तरंजित थरार; गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला, नेमकं काय घडलं?

Woman Attacks Lover After He Refuses Divorce to Wife: महिलेनं प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर दुखापत झाली.
Woman Attacks Lover After He Refuses Divorce to Wife
Woman Attacks Lover After He Refuses Divorce to WifeSaam Tv
Published On
Summary
  • महिलेकडून प्रियकरावर चाकूने हल्ला.

  • अनैतिक संबंधातून महिलेनं केला बॉयफ्रेंडला संपवण्याचा प्रयत्न.

  • प्रायव्हेट पार्टवर चाकू हल्ला.

मलेशियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका ३४ वर्षीय बांगलादेशी महिलेला तिच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला आणि त्याच्या प्रियकराचे अनैतिक संबंध होते. महिलेनं बॉयफ्रेंडला त्याच्या पत्नीला काडीमोड देण्यास सांगितले होते. मात्र, प्रियकराने नकार दिला. याच रागातून महिलेनं प्रियकरावर हल्ला केला. हे प्रकरण उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

हे प्रकरण जोहोरच्या गेलांग पताह परिसरात घडली आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, ही घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली. वचन देऊनही पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिल्यानं महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रियकराने त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिल्यानं गर्लफ्रेंड संतापली. यामुळे जोरदार वाद झाला.

Woman Attacks Lover After He Refuses Divorce to Wife
महामार्गावर अपघाताचा थरार! विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची पिकअपला धडक, ४ जणांचा मृत्यू

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाच्यावेळी महिलेनं २९ सेंटीमीटर लांबीचा चाकू बाहेर काढला. तसेच प्रियकरावर सपासप वार केले. महिलेनं प्रियकराच्या गुप्तांगावरही वार केले. या हल्ल्यात प्रियकराला गंभीर दुखापत झाली.

जखमी पुरूषाला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रियकरावर उपचार सुरू आहे. घटनेच्या सुमारे दोन तासांनंतर महिलेला अटक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Woman Attacks Lover After He Refuses Divorce to Wife
लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी भेट; E-KYC करणाऱ्यांना हप्ता मिळाला की नाही?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com