RCB Victory Parade : 'विराट' विजयाची परेड रद्द, मुख्य प्रवेशद्वारावर तुफान गर्दी; चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी कशी झाली?

RCB Victory Parade Stampede : अचानक परेड रद्द झाल्यामुळे निराश झालेले चाहते देखील थेट चिन्नास्वामी स्टेडियमकडे निघाले. काही वेळातच, स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमले आणि परिस्थिती अनियंत्रित झाली.
rcb victory parade tragedy
rcb victory parade tragedy Saam Tv News
Published On

चेन्नई : आयपीएलच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दिमाखात विजय मिळवला. या संघाने तब्बल १७ वर्षांनी म्हणजे १८व्या वर्षी आयपीएलचं विजेतेपद आपल्या नावी केलं आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण संग हा बेंगळुरू पोहोचला आणि या संघाची शहरात विजयी रॅली होणार होती. मात्र, या रॅलीला गालबोट लागलं असून, गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आणि १० जणांचा यात मृत्यू झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते उत्सुक होते. चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन, आरसीबीने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर घोषणा केली होती की परेड संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल आणि त्यानंतर स्टेडियममध्ये जल्लोष होईल. नंतर हे स्पष्ट झाले की परेड रद्द करण्यात आली आहे आणि खेळाडू विधान सौधाहून थेट चिन्नास्वामी स्टेडियमकडे गेले.

अचानक परेड रद्द झाल्यामुळे निराश झालेले चाहते देखील थेट चिन्नास्वामी स्टेडियमकडे निघाले. काही वेळातच, स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमले आणि परिस्थिती अनियंत्रित झाली. स्टेडियमबाहेर आणि विधान सौधाभोवती मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे परिस्थिती चेंगराचेंगरीसारखी झाली. चाहत्यांनी त्यांच्या चॅम्पियन खेळाडूंची, विशेषतः विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांची एक झलक पाहण्यासाठी धक्काबुक्की केली.

rcb victory parade tragedy
Bengaluru Stampede : बेंगळुरुत मृत्यूचं तांडव! चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू; तरीही RCBचं सेलिब्रेशन सुरु, व्हिडिओ समोर

गर्दी नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. चिन्नास्वामी स्टेडियमच्या भिंतीजवळ लोखंडी जाळी बसवण्यात आली होती आणि लोक शॉर्टकट म्हणून त्या जाळीतून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पाऊस सुरू झाला आणि असं म्हटलं जात आहे की यादरम्यान, पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, बेंगळुरूत स्टेडियमबाहेर गर्दीच्या रेट्यामुळं झालेल्या चेंगराचेंगरीत १० जणांचा जीव गेला. लाखमोलाचे जीव गेले, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाचं सेलिब्रेशन थांबलं नाही. आरसीबी जिंकल्यानंतर संघाच्या धुरंधरांनी ट्रॉफी उंचावताना प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळं आम्हाला जिंकण्याचं बळ मिळालं असं छातीठोकपणे सांगितलं. पण याच प्रेक्षकांचा जेव्हा स्टेडियमबाहेर बळी गेला, तेव्हा त्याचं साधं दुःखही व्यक्त न करता, उलट सेलिब्रेशनमध्ये धन्यता मानली. त्यामुळं एका वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

rcb victory parade tragedy
Stampede in RCB Victory parade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला गालबोट; चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com